Sunday, February 26, 2012

सगळेच एका माळेचे बेशरमाचे फुलं ..

सगळेच एका माळेचे बेशरमाचे फुलं .............. आताच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालीखे ची निवडणूक झाली, निवडणुकीच्या आधी प्रत्येक राजकीय पक्ष्याचे नेते मंडळी एकमेकांवर शेन फेकत होते , आरोप प्रत्यारोप करत होते. काही लोकांनी तर व्यायाक्तिक पातळीवर जाऊन शाब्दिक चिखल, शेन किंवा आणखीन काही फेकलेलं आपणच पाहिलोत ऐकलोत. पण आता निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापनेची वेळ आली तर नुसती रस्सीखेच चालू आ...हे. ज्या ज्या जागी एका पक्ष्याची एकहाती सत्ता नाही आली तिथे आधी कठोर विरोध करणाऱ्यान सोबतच युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी धावपळ चालू झाली आहे .
मला समजत नाही आम्ही सामान्य जनता ह्या सगळ्या लबाड , थोताड लोकांवर कसकाय विश्वास ठेवत आलोय आणि आजूनही ठेवतोय, आजूनही ह्यांच्या निवडणुकीच्या काळात बोललेल्या वाक्यांवर बळी पडतोय. हे लोक निवडणुकीच्या काळात येतात एकमेकांवर आरोप करतात एकून एकाचा शब्तिक बलात्कार करतात आणि पडद्या मागे मात्र एकच आसतात. म्हणजे ते एकंदरीत सगळ्या सामान्य जनतेला 'उल्लू' बनवतात आणि मुख्य म्हणजे आम्ही 'उल्लू' बनत आलो आन बनतोय.
मित्रहो मला एकच सांगायचा आहे हे सगळे नेते एकच , ह्यांना ना तुमच्या आमच्या भावनांचं काही घेणं देणं आहे कि देश्याच्या, राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या हिताचं घेणं देणं आहे... ह्यांना फक्त हवी आहे ती सत्ता मग ती कश्या प्रकारे हि मिळाली तरी चालेल. मग त्या नेत्यांच्या बोलण्या प्रमाणे तुम्ही आम्ही का वागावे ????, त्यांनी म्हटले तर नाचावे ??? आणि त्यांनी म्हटले तर पाय तोडून बसावे ??.... का का करावे असे ???.... खरच असे वाटते कि मतदान करावे तर करावे कुणाला ???... जर निवडणुकी नंतर पडलेला आणि निवडून आलेला दोघे पण एकच तर निवडून द्यावे तर कुणाला ?????????????? ...सगळे एकाच माळेचे बेशरमाचे फुलंच आसतील तर माळ वोवायची ती कशाला ....... ह्या प्रश्नांचे उत्तर मला तरी सापडत नाहीये ........... बघा तुम्हाला सपातील का ते ..............
सुधाकर पाटील
25 Feb 2012

No comments:

Post a Comment