Thursday, December 17, 2009

आहे मला नशिबावर विजय मिळवायचं

काल अंधार्या रात्री
होती एक कविता सुचली
पण सकाळी एक बातमी कळली
अन लेखणी माझी दुसरीकडेच वळली

नियतीचा खेळ बघा
किती विचित्र आसतो
एका गोष्टीची आमिष दाखवून
तारजोड दुसर्या मध्ये करायला लावतो

मन हे हळवा आपला,किती अपेक्ष्या ठेवतं
त्याचा तरी कुठं चुकतं
केलेल्या कामाचा फळ, वेळेवर मिळावा
एवढच त्याला वाटतं

पण
का हवं ते मिळत नाही ?
अन
का मनाला कळत नाही ?
ताण घेण्यात आता अर्थ नाही
का तो हे मानत नाही ?

आता मला समजत नाही
दोषी कुणाला ठरवायचा ?
नशिबाच्या नावाने खडे फोडायचा ?
कि आपलंच चुकलं म्हणून शांत बसायचा .....

नशीब आहे तरी काय ?
हे मला आहे जाणायचं
येशील का माझ्या सोबत
आहे त्याला विचारायचं .

कुणीतरी म्हणे कि पदोपदी नशीब
कसोटी पाहत आसतं
जितका आपण लढावं
तितकाच ते लढवत आसतं

आता मी ठरवलंय
नशिबा सोबत लढायचं
न देता ध्यान ह्या अश्या गोष्टींवर
काम आपला करायचं
लक्ष्य केंद्रित करून कामावर
आहे मला नशिबावर विजय मिळवायचं
आहे मला नशिबावर विजय मिळवायचं

सुधाकर -- तारीख १८ डिसेंबर २००९

Wednesday, December 16, 2009

विदेश भ्रमण ||

टांगून घराच्या खुंटी ला मनं |
आलो देहाला घेऊनं |
सुधा म्हणे प्राप्त कराया रे अधिक धनं |
विदेशी करतो भम्हनं | माय देशाला सोडूनं ||

काय होईल आता विचार करूनं |
ह्यालाच म्हणतात रे जीवनं |
सुधा म्हणे असेल तुला जीवनात काही मिळावनं |
नाही होत गोष्टींना सगळ्या सांभाळणं ||

गाव सोडावे लागले | लागले सोडावे घर |
यावे लागले दूर | सातासमुद्राच्या हि पार |
सुधा म्हणे एवढा का रे करतो विचार |
भेटला नं नवीन मित्र परिवार ||

माझिया एकची सांगणं | आहे स्वतःला सांभाळणं |
सगळ्यात मिसळून राहणं | सगळ्यांना घेऊन चालणं |
सुधा म्हणे असेल विदेशी जरी जगणं |
न सोडे मायबोली वागणं ||

न पडे वादात | पैश्या च्या नादात |
न जाये भरकटत | राहे शांत विचारात |
सुधा म्हणे असला जरी दूर विदेश्यात |
राहे पाटलाच्या रुबाबात ||

करे स्वतःची पिळणं | कष्टाची मळणं |
न घेता वळनं | आहे फक्त पुढे पळणं |
सुधा म्हणे आता एकची बोलणं |
मज आहे उंच आकाशी उडणं ||

सुधाकर पाटील
तारीख १६ डिसेंबर २००९