Friday, November 27, 2009

आई परत येणार मी - कविता

तारीख कळल्यावर अमरिका ला जन्याची, एकच धावपळ उडाली
स्वप्नात जे होता पहिला, येताच ते वास्तवात उगीच भीती वाटली ....
भेटी गाठी झाल्या, सत्कार झाले , खरीदी झाली ब्यागही भरली
हि सगळी गडबड तर लग्नाच्या हि वर गेली

पाटलाचा पोरगा बाहेर देश्यात चाललाय,
म्हणून बघायला त्याला गाव जमा झालं
घरातून पाय काढताना माज्या लक्ष्यात आलं
आजीशी थोडासा बोलायचा तर राहूनच कि हो गेलं..

स्वप्नांची दुनिया बाहेर बोलावत होती
आपुलकीची छाया घरात खेचत होती
काहीतरी मिळवण्यासाठी हे सगळा सोडायचं?
आता घरासमोरच्या आंगणात आम्ही कधी खेळायचं ?
आज अश्रूंचा वजन स्वप्नाहूनही ज्यास्त झालं
नकोच ती अमेरिका आस हजारदा वाटून गेलं

विमानतळावर घराच्यान सोबत मित्र मैत्रिणींची हि गर्दी जमली होती
कधी नव्हे ते मी आज खिस्यात अंगार्याची पुडी जपली होती
हसत होतो, बोलत होतो, सगळ्यांचा निरोप घेत होतो
बाबांच्या च्या डोळ्यात डोळे मिसळायला मी मात्र भीत होतो ..

पाठ फिरविण्याची वेळ जेंव्हा झाली ,
तेवढ्यात बाबांची पापणी हलकीच गलबलली
आणि ..........
आणि बराच काही बोलून गेली .....
" सातासमुद्रा पलीकडे निघालास . साम्राधीच्या देश्यात निघालास........

चढताना याश्याच्या शिकारावर , काळजी इकडची करू नकोस
पण असला कितीही काम तरी , फोन करायला विसरू नकोस

एका डोळ्यात कवतुक आहे , तर काळजी दुसर्या डोळ्यात
तुझी खूप आठवण येईल रे , जाताना रोज मळ्यात

व्याव्साहीकातेच्या दुनियेत मनातला ओलावला हि जप
जसा आहेस जाताना , येताना हि तसा अस ..

पश्यत्य संस्कृतीत झालास जरी दंग , तोल तू कधी सोडू नको
मिळाले सर्व पदार्थ विमानात जरी , डब्यात ठेवलेले आईचे लढू तू विसरू नको

नवीन जागी नवीन लोकांत जाताना , आपलासा त्यांना करायचा असता
पण आपलासा त्यांना करताना ,आपल्यांना कधी विसरायचा नसता ".......

मित्र विचारतात मी काय मिस करतो, कसं सांगू मी काय काय मिस करतो
कार्निवल च्या पार्टी मध्ये अंधाधुंद नाचलो होतो
ऑफिस समोरच्या चहा च्या आहारी आम्ही गेलो होतो
cubicle च्या गप्पा मध्ये पार आम्ही रंगलो होतो
sodexo चाच का होईना 'इंडिअन फूड' , कधी काळी मनसोक्त आम्ही जेवलो होतो .....
हे होतं ऑफिस चं जे रोजच्या जीवनाचा एक भाग होतं
ज्या गोष्टीं माझा जीव आहेत, त्या साठी १०० पानांचा पुस्तकही कमी पडतं ....

इथली सुसंस्क्रत साम्पानता पाहून तोंडात बोटे जातात
साम्राधीच्या देश्यातले लोकही मात्र समाधानच शोधतात
इथल्या इंग्रज्लेल्या भारतीय पोरांना पाहून डोळ्यात सनक भरते
मराठी मंडळीतही इंग्रजीत बोलताना अक्षरशः कीव येते
मित्रत्व बजावतात , पण मित्र कधीच नसतात
इथल्या सगळ्या गणिताचे उत्तरही नेहमी शून्य येतात

म्हणून कधी वाटता देऊन टाकावेत जिंकलेले सारे किल्ले तहात
राहावा परत आपल्या देश्यात, मावळ्यांच्या सहवासात
आईच्या हातची पुरण पोळी खावी , ताई च्या हातची बासुंदी चापावी
F C रोड वर उगीच इकडून तिकडे चक्कर मारावी
नेणे काकांचा पान खाऊन नांदेडी शिवी पुणेरी स्वरात द्यावी
(.... आरे नेणे काकांचा बिल राहिलाच कि )

परका आभाळ जिंकण्यासाठी, जमीन आम्ही सोडली,
इथूनही आभाळ दिसतंय तेवडच उंच
पण आतातर पायाखाली , जमीनही नाही राहिली
न राहिलो आपुले, न झालो परके
झालो आम्ही अधांतरी , झालो आम्ही अधांतरी

असा अधांतरी मला तू सोडू नको
आई तुझाच एक पुत्र मी
राजेंनी सोपवलं एक काम
राजेंचा एक सरदार मी..

राजेंची आज्ञा पाळणार मी
काम फते करणार मी
अन झाल्यावर काम फते
आई परत नक्की येणार मी

आई तुझ्या छायेत खेळणार मी
आई तुझ्या कुशीत झोपणार मी
आई परत नक्की येणार मी
आई परत नक्की येणार मी


संधर्भ मराठी रो ग्रूप
मूळ अधांतरी संवाधातून

Thursday, November 26, 2009

पाटील पोहोचले अमेरिकेत !!

१४ नोव्हेंबर, अखेरीस तारीख ठरली (तारीख ठरली म्हणजे आपल्याकडे एकाच शंका येते, ती तारीख नाही तर तारीख ठरली ते अमेरिकेला जन्याची बारा का). हो प्रोजेक्ट manager सांगितला कि मला पुढच्या शनिवारी अमेरिकेला जयायचा आहे, मनात ख़ुशी आवरली नाही पण माझी एकाच तारांबळ उडाली. नाही तर काय किती कामा बाकी आहेत ?.flat बुक केलाय त्याच्या registration करायचा आहे, घरी गावी जायचा आहे, शॉपिंग करायची आहे, थंडी साठी कपडे पाहिजेत ते घ्यायचे आहेत, आम्ही कधी फॉर्मल कपडे नाही वापरले आणि तिथ अमेरिकेच्या हापिसात फॉर्मल कपडेच घालावे लागतात म्हणे ते घायचे आहेत,घरच्यांना भेटायचा आहे,आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे काय तर म्हणे ७ दिवस आहेत फक्त एक आठवडा कसा श्याक्या आहे ?... आहो सगळ्यात महत्वाचा म्हणजे माझा लगीन बाकी आहे ......आसो इथं पोरीचा पत्ता नाही आणि लग्न एका आठवड्या मध्ये कसा श्याक्या आहे ..... ( आता सांगा onsite म्हणजे खुशीची गोष्ट असते का ? just kidding हां :)) .माझी एकाच तयारी सुरु झाली , काही आसो गावी जाणा compulsory आहे मग काय गावी गेलो. आता गावाची गोष्ट एक वेगळीच, रात्री गावी पोहोचायला जरा उशीर झाला घरच्यांशी गप्पा झाल्या, जेवण झाला ( पोरगा अमेरिकेला जाणार म्हणून गप्पा, जेवण, वागणूक एकंदरीत सगळा जरा वेगळाच दिसत होता). घरच्यांच्या आणि त्यांच्या अनेक प्रश्नांना मला सामोरे जात होतो पण आई च्या समोर जन बसणं खूप आवघड झाला होता..... सगळे काही न ऐकता फक्त प्रश्न्न वर प्रश्न विचारात होते आणि सगळ्यांकडून एक common प्रश्न म्हणजे " आता लग्न च्या जवळ का जात आहेस ? काही तरी गफलत आहे ? :). गप्पा करून रात्री उशिरा (निसर्गाच्या नियम नुसार रात्री झोपावे लागते म्हणून) मला झोपायला परवानगी दिली आणि मी झोपलो.रात्री झोपायला वेळ झाला म्हणून सकाळी उशीरच उठलो. एरवी काही आसो सूर्य दिसण्या आधी उठवणारे माझे बाबा आज 9 वाजले तरी नाही उठवले. मी उठलो देवाला जाऊन आलो आणि बघतो तर काय घरी जत्राच भरली होती कि हो . आता रात्रीच्या प्रश्नांची पुन्हा पुनरावृती होत होती फरक एवढा होता कि रात्री फक्त १५ लोक होते आणि आता २०० च्या वर. सगळ्यांना ऐकायला येत न्हवता म्हणून उठून भाषण द्यायचा ठरला( ते काम मी चोख पाने करू शकतो सगळ्यांना माहित होता नं), बाकी तीन चार लोकंचे पण भाषणं झाली. आस वाटत होता कि मी राजें च्या सैन्यादालातला एक सरदार, राजेंनी सोपवलेला एक काम करायला, एक गाढ जिंकायला जात आहे ....... सगळा प्रोग्राम झाला आता निघायची वेळ झाली, गावातून निघताना आसा माहोल झाला होता जसा लग्न करून एक मुलगी तिच्या सासरी चालली आणि सगळे तिला सोडायला आले.....पुण्याला आल्यावर कळला कि cyclone मुळे म्हणे इमान cancel होऊ शकते . आता वाटला काही खरा नाही आस जर झाला तर हे आस झाला आसता जसा " लग्नाची पूर्ण तयारी झाली , लोक आले, अक्षदा वाटल्या गेल्या, आणि कळला कि नवरीच नाही ".पण देवाच्या कृपेने आस काही नाही झाला. करत करत रविवार उजाडला, घरून सगळे घराचे आणि पाहुणे आले होते , सकाळी आम्ही दगडू शेठ गणपती ला जाऊन आलोत, ४-५ दिवसापासून ब्याग्स भरलेले जेन्वा वजन केला तर कळला कि टोटल ९ kg ज्यास्त आहे मग काढावा तर काय काढावा, सगळा तर गरजेचाच वाटत होता. मग आईने जे घरून करून आणलेला होता तेच सगळा काढण्यात आला, सगळ्यात नाराज मी इथं झालो :( . एकंदरीत सगळा आटापिटा करून तयारी झाली पुण्या वारणा घरचीच गाडी घेऊन निघालो. आता driver आमच्या गावाकडचा होता, त्याला रस्ता माहित न्हवता, तो रस्ता चुकला जुन्या highway ने आम्हाला नेत होता, लोणावळ्याला दूर्त गती मार्गावर आलो, अर्धा mile पुढे गेल्यावर कळला कि आम्ही तर परत पुण्यालाच जात होतो. आता मात्र मी घाबरलो वाटला मला काय इमान नाही सापडणार .... कसा बस करत मुंबईत आलो खरा पण विमानतळावर कसा पोहोचणार, रस्ता तर नाही माहित. विचारात विच्यारात चेंबूर पर्यंत आलो मग एक सरदारजी taxi वाले भेटले, त्यांच्या मागे मागे कसे बसे करत एकदाचा विमानतळावर पोहोचलो.इमानातालावर सगळे मुंबई चे मित्र आणि मैत्रिणी पण आले होते. आता विमानतळावर ची गाठ मला नाही सांगता येणार. लास्टला खरच खूप senty वातावरण झाला होता. आर्धा तास उशिरा का होईना एकदाचा इमान उडाला रे बाबा. आणि सोळा घन्त्यानंतर (पक्ष्याची धडक न खाता) नेवार्क ला येऊन ठेपला, इमानाचा पहिला पण एक अनुभव होता पण तो फक्त ४ तासाचा आणि हा मात्र १६ घन्त्याचा म्हणून काही आस वाटला नाही . तिथून आजून एक इमानात बसून आलो मी बुफाल्लो मध्ये येऊन पोहोचलो .खाली उतरल्या वर मी स्वतः ला विमानतळावरच्या आरश्यात बघितला आणि खात्री करून करून घेतली कि मी पोहोचलो अमेरिकेत , पाटील पोहोचले अमेरिकेत !!

"गोष्ट छोटी डोंगरा एवढी"

आजच "गोष्ट छोटी डोंगरा एवढी"हा मराठी चित्रपट पाहीला. तस आम्हाला मराठीचा आणि तिच्या संवर्धना साठी झटनार्यांचा फार अभिमान.पण नुसत्या पोकळ गप्पा न मारता कुणी काही करून दाखवलं तर आम्हाला अधिक आनंद होईल.आणि तोच हा मुव्ही पाहिल्यावर झाला. निळू फुले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे , नागेश भोसले आणि अनेक पट्टीच्या कलाकारांनी केलेली हि एक अप्रतिम कलाकृती आहे.त्यासोबतच आम्हाल जे भावले, ते म्हणजे विषय आणि त्याची तंतोतंत हाताळणी.अहो शेतकऱ्याच्या प्रश्नाला असा हात घातलाय जसा बरोबर अर्जुनाने पक्षाचा डोळा नेमला गेला आहे [निळू फुलेंचा एक डायालोग: "अहो, मरणाचे शेतकऱ्याला एक लाख देता, जगण्याचे पंधरा-वीस हजार तर द्या"]. एकंदर चित्रपट एकदाच नव्हे तर अभ्यास म्हणून अनेकदा पाहण्यासारखा आहे .अभिनय करताना कलाकाराच्या तर डोळ्यात पाणी येतेच पण बघानाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणल्याशिवाय कलाकार राहत नाहीत.मी सर्वाना कळकळीची विनंती या कृषिप्रधान देशातील नागरीकानो हा मुव्ही तर नक्की पहा.शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्या,ते तुमच्याशी कशे निगडीत आहेत ते हि समजून घ्या.शेवटी तुम्हाला आम्हाला पोसणारा उपाशी राहिला आणि पटा पटा आत्महत्या करायला लागला तर... तुम्हीच विचार करा काय होईल! अहो तो निराश होऊन तो शहरात येईल, कारखान्यात काम करेल, तिथे हि तो चटणी भाकरच खात होता आणि इथे हि तेच खाईल. त्याल काही फरक पडणार नाही, पण आपल्यासारख्यांचे काय...? आपण उपाशी मरू! त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय उरणार नाही.बघा एक दिवस दाना सुद्धा मिळणार नाही! पण आता आमचेच प्रश्न कमी आहेत का की आम्ही ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघायला जाउत",हा विचार ही काही बहादूर करणार असतील त्यांना आमचा सलाम!शेतकर्यांचे मूल उच्य शिक्षित का नसतात,त्यांच्यात पात्रता नसते का ?,कृषिप्राधान देश्यात शेती करने मंजे आभिमनाचा व्यवसाय वाटायला पाहिजे तीथ शेती करने , शेताकर्यच्या पोटी जल्माला एने मंजे पाप करून आल्या सारखा वाटत आसेल तर ह्या पेक्ष्य लाजिर्वानी गोष्ट कोणती आसवी आमच्या साथी ह्या सगल्या गोष्टी च विच्यार करून म्हन की आणखी हजारो प्रश्नांचे कोडे न सोडता येत असल्या मुले म्हणा , का?का?शेतकरी आत्महत्या करतो ? ..म्हणजे नेमकं काय करतो? तो ती का करतो? आणि मग त्यानंतर त्याच्याशी आणि मागे राहिलेल्यांशी काय होता? याची माणूस म्हणून थोडी जरी जाणीव करून घ्यायची असेल तर "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" नक्की बघावा!

बजावा मतदानाचा हक्क - विधानसभा निवडणूक विशेष

पाहता पाहता तेरा तारीख जवळ येऊन ठेपली, सगळी कडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, रोज रोज खास्या, आणि मातब्बर नेत्यांच्या सभा रंगत आहेत, आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव होत आहे। कुणाला बदल हवाय तर कुणी आहे तेच स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे। रिंगणात उभे राहिलेला प्रतेक उमेदवार तर रोज रात्री झोपतो आणि सकाळी आमदार होऊनच उठतोय। एकंदरीत महाराष्ट्रातल्या प्रतेक वर्गातला व्यक्ती आज विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करत आहे. पण एक वर्ग मात्र शांत आहे. जे काही घडत आहे त्या कडे दुर्लक्ष करत आहे, त्याकडे बघायला पण ह्या वर्गाला वेळ नाहीये
हो एक वर्ग ज्याला महाराष्ट्रानं घडवलं, शिक्षण दिलं, सुशिक्षित बनवलं, स्वतः विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी पात्र बनवला.. तोच आणि तोच वर्ग आज शांत आहे ...... . आणि त्याच वर्गा बद्दल वर्गातल्या व्यक्तींबद्दल मला बोलायचय, जे विचार करत असतील कसा करायचा उपयोग तेरा तारखेच्या सुट्टीचा. म्हणत आसतील "can we plan for something on 13 Oct " आहो काहींना तर माहीतच नाही तेरा तारखेला काश्याची सुट्टी आहे ते.
बरोबर आहे कसा माहित राहणार आम्हाला, आणि काय करायचय आम्हाला माहित करून, आम्ही... आम्ही उच्य शिक्षित ना, आम्ही उच्य पगारी, आम्ही उच्य विच्यारी, आम्हाला ह्या राजकारणावर नाही भरोसा, सगळे एकाच माळेचे म्हणी मग का करायचा मतदान आसे विच्यार आमचे. आरे उच्य पगारी, उच्य विच्यारी माणसांनो, तुमच्या आश्या विच्यरांमुळे, देशाला, महाराष्ट्राला लाच्यारी येण्याची वेळ आली आहे.
" हे सगळे राजकारणी ढोंगी आहेत " , " आमचा सरकार लाचार आहे " , "विधानसभेत सगळे गुंड जाऊन बसले आहेत " , " अश्यांना लोक निवडून देतात तरी कसे " आसेच आपण वर्षानुवर्षे बोलत आलेलो आहोत . आरे नुसता बोलातच आलेल्या शहाण्यांनो, जेंव्हा वेळ येते तेंव्हा करता काय? . निवडणुकीचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून समजता, आणि मतदान करण्याच्या ऐवजी मजा करता !! . मतदानाचा हक्का ना बजावता बोलण्याचा तुम्हाला काय आधिकार !!! . आम्ही खूप व्यस्त , मतदान करायला आम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही फक्ता बोलतो, आणि मतदान हे आमचा काम नाही मतदान करणे हे काम आहे ते बीनकामी, अडाणी, अविचारी माणसांचा. हेच काय तर राजकारण, निवडणूक हे म्हणजे धनाढ्य आणि गुंड लोकांचाच काम आहे हे जणू काय आम्ही ठरूनच ताकालोय .
वेळ नाही म्हणणारे आम्ही, राखी सावंत चा स्वयंवर नाही आवडत म्हणत रोज दोन तास चर्चा करतो पण कुणाला आणि का मतदान करायचा हे बोलायला वेळ नाही आमच्या कडे, आम्हाला बिदाई मधल्या 'ती' च्या वडिलांच्या मित्रांच्या मुलाचा नावा सहित मालिकेतल्या आख्या पात्रांचे नाव माहित पण आपल्याच मतदार संघात कोण कोणते उमेदवार निवडणूक लढवत आहेत हे नाही माहित. ह्या वर्गातल्या मुलींच्या समोर तर निवडणूक, राजकारणाचा विषय काढणे म्हणजे आधीच जवळ न येणाऱ्या मुलींना ४ हात दूर करणे होय. ह्यांच्या शी बोलावा तर एखाद्या सिनेमा बद्दल, एखाद्या अभिनेत्या बदलच, आहो मी कुठ म्हणतो कि तुम्ही त्यावर नका बोलू म्हणून, बोला कि बिन्दास्त बोला, बिनधास्त राहा, पण आधी बिनधास्त पणे राहण्याची वेळ आणा. हे ५-६ उरलेले दिवस विचार करा, मतदान करण्यासाठी एक तास वेळ द्या, चांगल्या उमेदवाराला विधानसभेवर पाठवा आणि राहा बिनधास्त ५ वर्ष.
मित्रहो, मी तुम्हाला सांगणार नाही कि तुम्ही कुणाला मतदान करावे. उमेदवाराची पात्रता कशी ठरवावी, कोणत्या मुद्यावर उमेदवाराला मतदान करायचा हे मी तुम्हाला नाही सांगणार. कारण तुम्ही जाणते आहात, मतदान कुणाला करावे हे तुम्हालाच ज्यास्त कळत, पण तुम्हाला ठरवायचा आहे कि तुम्हाला ह्या वेळेस मतदान करायचंच आहे. आता मतदान कुणाला करायचा ते तुम्हीच ठरवा, नाहीतरी कुणीतरी म्हटलंच आहे साधी भाजी निवडताना १० वेळेस विचार करणारे आपण उमेदवार निवडताना पण विचार करणारच नं .
मी वर सांगितला कि तुम्ही म्हणता " अश्या गुंड लोकांना लोकं निवडून देतात तरी कसे. तुम्हाला वाटते दुरुची बाटली, पैसा घेऊन लोक मतदान करतात म्हणून हे गुंड लोकं निवडून येतात. पण मी सांगतो मित्रहो अश्या लोकांना विधानसभेवर पाठवण्या मागे जेवढा वाटा दारू,पैसा साठी मतदान करणाऱ्या अज्ञानी लोकांचा तेवढाच मतदान न करणाऱ्या तुम्हा आम्हा ज्ञानि, सुशिक्षित लोकांचा आहे. हे खरा आहे कारण आज आपल्या सारख्या लोकांमुळे ५० ते ६० टक्केच मतदान होते आणि त्यात पण १० ते २० उमेदवार उभे असल्यामुळे २० ते २५ टक्के मतदान ज्या उमेदवाराला मिळेल तोच निवडून येतो. म्हणजे बघा ज्या उमेदवाराला ७५ ते ८० टक्के लोक नाकारतात त्तोच उमेदवार आज विधानसभेवर जात आहे. राजकारणी भाषेत बोलायचा झाला तर ज्याची २० टक्के वोट बँक तोच आम?ार.
मला सांगा मतदान न करणाऱ्या ५० टक्के मध्ये कोण येतं ? , आम्हीच नं ? , मग सांगा नको असणारे उमेदवार विधानसभेवर पाठवण्यात कुणाचा ज्यास्त वाटा?. महाराष्ट्राची धुरा अपात्र लोकांच्या हातात देण्या मागे कोण दोषी ? . निष्क्रिय नेते तयार करण्याला कोण जबाबदार ? ह्या गोष्टीवर जरा विचार करण्याची वेळ आली आहे . तुमचा मत किती महत्वाचा आहे ह्याच्या महत्वाची महत्वपूर्ण जाणीव ठेऊन तुमचा मतदान करण्याला सगळ्यात ज्यास्त महत्व द्यायची वेळ आता आली आहे.
म्हणून म्हणतो एक दिवस दैनंदिन काम बाजूला ठेऊन , एक तास वेळ देऊन, उज्वळ महार्ष्ट्राच्या भविष्याचा विचार करून... उच्या शिक्षित , उच्या पगिरी वाल्या विचार आता तुला करायचा आहे, मतदानाचा हक्क बजाऊन चांगल्या उमेदवारालाच विधानसभेवर पाठवायचा आहे ।
सुधाकर पाटील
(माझा कुठल्याही राजकीय पार्टीशी संबंध नाही. खास या आपल्या मुख्यमंत्री ब्लॉग साठी लेख आणि या व्यासपीठावरून आपल्याला केलेले मनापसुनाचे आवाहन.)

शंभूराजे आम्हाला माफ करा !!!!

पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.
अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला "हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
बघताना तर सोडाच पण वर्णन करताना पण डोळ्यातून पाणी यावा आसा एक एक अत्याचार कवी कलशांवर होत होते आणि कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!
स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!! (संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)
जेन्वा मी वढू तुळापूरास गेलो , शंभूराजे च्या समाधीचे दर्शन घेतलो, तेंवा एक एक अत्याचार जो शंभू राजेंवर झाला तो प्रसंग जणू डोळ्यासमोर घडत आहे आस वाटत होता, तो प्रसंग कसा असेल हे आठूनच अंगावर काटे उभे राहिले . मग ज्यांनी प्रतेक्ष बघितला त्यांना काय वाटला असेल आणि ज्यांच्यावर प्रतेक्ष आत्याच्यार झाले हे शंभूराजे आणि कवी कलश ह्यांना कसे वाटले असेल , कसे सहन झाले असेल ? . पण हे सगळा त्यांनी सहन केला ते धर्म रक्षणा साठी आपल्या रायते च्या रक्षणा साठी .
शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास ज्याण्याला येवडा उशीर केला तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुल वाहायला उशीर केला

मूळ एका forworded e -mail मधून