Sunday, January 3, 2010

हे नव वर्षा साथ माझी तू देशील का ?

कधी वाटतं उंच आकाशी उडावं
तर कधी वाटतं चंद्रावर च घर बांधावं
कधी वाटतं इथल्या बर्फात बिना ज्याकेट चा फिरवा
तर कधी वाटतं हिमालया वरच जाऊन राहावा .... (बायको सोबत हं :) )

कधी वाटतं इथल्या फ्रोजन नदी वर कब्बड्डी चा खेळ मांडवा
तर कधी वाटतं सागरातल्या शार्क बाई सोबतच नाचावं ... ( ते हि मराठी लावणीवर)
कधी वाटतं इथल्या हरिणान सोबत दोव्ड करावी
तर कधी वाटतं वाघाच्या तोंडात हात घालून दातच मोजावे

कधी वाटतं स्वप्ना पाहणं सोडावं
तर कधी वाटतं स्वप्नातल्या 'ति' ला प्रतेक्ष्यात च भेटावं
कधी वाटतं रोज लंच अमेरिकेत तर
डीनर घरच्यांसोबत भारतात करावं
तर कधी वाटतं घरचा सगळा बारदान
आत्ता इथं अमेरिकेत च घेऊन यावं

उंच आकाशी उडण्याच्या
गप्पा मी करत आसतो
पण निवळ आळस करून
पंख कापल्या वाणी मी बसत असतो
झटकून आळस माझ्यातला
नव चैतन्य माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

हरिणाच्या सोबत दोव्ड करण्याची
इच्या मी बाळगत असतो
पण आत्मविश्वास हरवून
पाय मोडल्या वाणी मी बसत असतो
स्वतःवर विश्वास ठेऊन समोर पळण्याचं बळ माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

शार्क सोबत खेळण्याच्या आन
वाघाच्या तोंडात हात घालण्याच्या
बाता मी मारत आसतो
पण हिम्मत खचून
हात तुटल्या वाणी मी वागत आसतो
भीती माझ्यातली घालवून
मोठ्या अडचणींना समोर जाण्याचा सामर्थ्य माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

जीवनात माझ्या, बर्याच गोष्टी मी साध्य केल्या
पण काही तश्याच रखडून राहिल्या
रखडलेल्या कामांना मार्गी तू आता लावशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

आयुष्यात काही मिळवो न मिळवो मित्रांना मी जमवला आहे
मित्रत्वाच्या धाग्याने मित्रांची माळ मी ओवली आहे
गाठ आमच्या मैत्रीची दिवसेनदिवस घट्ट बांधून
माझ्या सोबत त्यांच्या इछ्या पण पूर्ण तू करशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

हे नव वर्षा .....
ह्या आभाळा एवढ्या आकांक्षा माझ्या
त्यातल्या काही तरी तू पूर्ण करू शकशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

सुधाकर पाटील
तारीख ३ जानेवारी २०१०

Saturday, January 2, 2010

कोण म्हणे कि अमेरिकेत जाऊन भारतीय माणुसकी विसरतात

अमेरिकेला येण्याची तारीख आली आणि थोडी भीती वाटत होती , वाटत होता, तिथ कुठ राहायचा , कसा राहायचा , बरं कसा राहायचा ते तिथ गेल्यावर बघू पण आधी तिथ जायचा कसा. माझी इमान सुटून गेली तर ? , इमान्तालावर माझ्या ब्यागा पास नाही झाल्या तर ?, तिथल्या इंग्रजी लोकांनी काही इच्यारलेला मला बोलता येईना गेला तर ? मला काही अडचण आली तर ? , येवडाच नव्हे तर मला हे पण वाटलं होता कि मी अमेरिकेला जाणार्या इमानात बसायचा सोडून अफगाणिस्थान ला जाण्याच्या इमानात बसलो तर (खरच बर्याच वेळेस मी नांदेड पुणे च्या ऐवजी नांदेड नाशिक त्रावेल्स(बस) मध्ये बसलो आणि नांदेड बाहेर आल्यावर जेन्वा समजला तेंवा पाटीलकी गाजून त्याला परत नांदेड मध्ये सोडायला लावला होता, ) तशी गफलत इथ झाली तर ? . ह्या सगळ्या 'तर' चे उत्तरांच्या परिणामांचा विचार करून माझा मन बधीर होत होता ( आहो इमानातून मला खाली फेकतील का इथपर्यंत पण मी इच्यार केला होता). पण तसा काही नाही झालं , इमानाचा टिकेट घेण्यासाठी जेन्वा traval department कडे गेलो तेंवा कळला कि आजून दोन माझे टीम मेट्स केतकी आणि नंदिता येतायत जे कि आधी २-३ वेळा अमेरिकेत जाऊन आलेले आहेत. हे ऐकून आधी सगळ्यांचे फोन क्रमांक , पत्ते १० जागी लिहून ठेवणारा मी आता फक्त त्या दोघींचे फोन क्रमांक लिहून घेतलो आणि एक मोठा श्वास घेतला वाटलं --------
"विठू माझा पंढरीचा नाथा | मज करपा केली आता|
मी ठरवला कि त्या दोघी जिकडे जातील तिकडे आपण जयायचा ( म्हणजे ते ज्या इमानात बसतील त्या इमानात आपण बसायचा ) . त्यांची मला बरीच मदत झाली. पहिल्यांदा आस झालं असेल कि प्रवासात मुलगा मुलीन वर अवलंबून आहे. कसा हि आसो एकदाचा आम्ही बफ्फेलो च्या इमान्तालाच्या बाहेर पडलो. त्या मला माझ्या हाटेलाची ची क्याब कुठं येती सांगितल्या, आणि जाशील न विचारून त्या गेल्या. त्यांना मी मोठ्या थाटाने म्हटला कि मी जायीन पण त्या जश्या गेल्या , आणि जसा हि मी एकटा पडलो तेंवा मात्र मला ३३ कोठी आठवत होते. माझ्या विठ्ठला ची आराधना केल्या विना मला राहवलं नाही हो..... पांडुरंगा .....
" देश सोडीला , गाव सोडीला | आता तूच सांभाळ रे विठला " .
तेवढ्यात माझ्या हाटेल ची क्याब आली , आणि एक जाड च्या जाड पोरगी ( आता तिला पोरगी म्हणावे का बाई हे नाही समजत ) आली आणि मला इंग्रजीत काही तर इच्यारली . मला काही कळला नाही तरी मी होकारार्थी मान हलवली आणि तसाच उभा राहिलो. मग ती बाईच ( पोरगी म्हटला तर अमेरिकेतल्या पोरींचा अपमान होईल हो ) माझ्या ब्यागा क्याब मध्ये ठेवली आणि मला हाटेल च्या दारात आणून सोडली आणि गायब झाली . मी वाट पाहत होतो कुणी येईल आणि सर सर म्हणून ब्यागा उचलेल , पण तसा झालं नाही , मीच ब्यागा घेऊन चेच्क इन केला आणि एकदाचा रूम मध्ये येऊन ठेपलो ( मला नंतर कळला , ती बाई माझ्या ब्यागा क्याब मध्ये ठेऊन माझ्यावर उपकार केली होती कारण इथ म्हणे सगळा स्वतःचा काम स्वतः करायचा आसता. (तसा आपण स्वतःचा काम स्वतःच करता हो पण जाऊ द्या ज्यास्त खोलात नको जाययला नाही का?)
२० तासाच्या प्रवासाने मी न थकता ह्या २० मिनिटांच्या प्रकारे मुळे थकलो होतो. हॉटेल च्या रूम मध्ये पडलो . वाटत होता मी इथपर्यंत आलो खरा पण , हे नवीन देश , नवीन लोक, नवीन गाव , मी एकता पडलो ह्या देश्यात ह्या गावात , कुठ जयायचा , कुठ राहायचा, आणि मुख्य म्हणजे काय खायायचा पुन्हा तेच प्रश्न पडत होते , वाटत होता
काहीच नाही मी | कोनिया गावीचा |
एकटा ठाई चा | ठाई एक |
तेवढ्यात माझी मैत्रीण प्रिया चा फोन आला , मला ती माझ्या प्रवास बदल विचारपूस केली आणि म्हटली " उद्या हापिस मध्ये मी तुझा डबा घेऊन येईन " , मला इतका छान वाटलं तुम्हाला सांगतो .. वाटलं आपण एकटे नाहीत, आपले मित्र , मैत्रिणी, टीम मेट आहेत आपल्या सोबत. माझ्या घाबरलेल्या सुधाकरच्या दुखी मनाला समजावून मी झोपलो .
सकाळी उठून हापिसला गेलो (ते पण एका भारतीय मुलाने मला हापिस पर्यंत नेऊन सोडला) . हापिसात आल्यावर सगळ्यांची ओळख झाली . सगळ्या इंग्रजी लोकांची पण ओळख झाली . सगळा आगदी वेगळा वाटत होता पण मस्त वाटत होता. कसं बस करत जेवणाची वेळ झाली आणि आम्ही लंच टेबल वर सगळे भेटलो . टेबल वर गेल्यावर कळला कि माझ्या साठी तर ३-४ लोकांनी डबा घेऊन आलेला . सगळ्यांच्या डब्याची चव घेतली . आणि चर्चे ला सुरुवात झाली . चारच्या म्हणजे काय तर मी हॉटेल मध्ये राहतोय हे काही बरोबर नाहीये . कुणी तरी मला adjust करून घ्यायला पाहिजे वगेरे वगेरे. खरच मला हॉटेल मध्ये राहावा वाटत न्हवता पण एव्हडाहि ताण नव्हता. मी एकता राहतोय हॉटेल मध्ये ह्याचा, माझ्या पेक्ष्या वायीट मित्रांना (अजून न झालेल्या मित्रांना - त्या वेळे पर्यंत माझा नीरज सोडून कुणी मित्र नव्हता ) वाटत होतं हे समजल्यावर मला खूप मस्त वाटला.
दुसर्या दिवशी मला पंकज आणि मोसिन ने त्यांच्या अपार्टमेंट मध्ये राहायला येण्यासाठी बोलावलं. मी त्यांच्या कडे राहायला गेलो . आस वाटत होतं मी पुण्यात राहतो , अमेरिकेत असून सुधा राहण्याचा आणि खाण्याचा ताण नाही म्हणजे किती मोठी गोष्ट आहे न . त्या १० -१२ दिवसात आमचा खूप जमायला लागला . मी पूर्ण पने फुकट राहून , फुकट चा खात फुकट च्या गप्पा मारत होतो (पाटलाच्या आवाजात ). मला मोसिन आणि पंकज तर सुध्या म्हणायला लागले ( मला सुध्या म्हटलेला खूप आवडता , आस वाटत कुणी तरी खूप जवळचा बोलावताय ) . पण १२ दिवसा नंतर मला एका अपार्टमेंट मध्ये जागा मिळाली. मी मोसिन, पंकज अपार्टमेंट मधून जाताना दोघेही म्हणत होते " हे १२ दिवस खूपचं मस्त गेले, आस वाटते तू इथच राहावा, आपण adjust करू"( offcource हेच वाक्य मोसिन ने मराठीतून तर पंकज ने हिंदीतून म्हटला) . मला हे ऐकून खूप छान वाटलं, छान ह्या बदल कि, त्यांनी मला तिथेच राहण्याची ऑफर दिली आणि त्यांनी ती ऑफर मला दिली कारण त्यांना माझा स्वभाव आवडला होता.
मी इथ येण्या आधी पासून तर इथ आल्या नंतर, ब्याग मध्ये काय काय आणायचा ह्या पासून तर इथ मोबायील/ल्याप्टोप घेण्यापर्यंत, बँक आकॉउंत ओपन कारे पासून तर SSN काढे पर्यंत जो हमेश्या मदत केला, तो म्हणजे नीरज. सुरुवातीला मोबयील घेणे वगेरे साठी सुप्रिया आणि गौरी ची मदत कामी आली. कमलेश, अरुण, नीरज च्या मदतीने मी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या , तर मोनिकाच्या मदतीमुळे मी apartment घेऊ शकलो.
मला कार रेंट करायचा होती , अरुण च्या मदतीने मी कार रेंट केली( हं कार वापस करण्यामागे कारण मात्र मस्त होता ते आसो ) आणि पहिल्याच वीक मध्ये आम्ही नायगरा फाल ला गेलो. ट्रीप मध्ये मी, कमलेश, पुरू , अरुण आणि पंकज होतो , ट्रीप मध्ये खूप मजा केली , आस वाटत होतं कि हे सगळे माझे कॉलेज चे मित्र आहेत , तेंवा पासून आमची मैत्री आहे. त्या दिवशी आम्ही पार्टी केली, मग काय नंतर पर्त्यान वर पार्ट्या वाढत गेल्या , आता तर मी माझ्या अपार्टमेंट पेक्ष्या ७-१०, २४-१२ मध्ये ज्यास्त पडलेला आसतो. अरुण आणि कमलेश ने बनवलेले नवीन नवीन चीकेन चे प्रकार ( चीकेन कोल्हापुरी सोडून ) तर पुरू ने बनवलेले स्वीट्स खात आसतो मध्ये मध्ये मोसिन आणि पंकज कडे पुरी , गाजर चा हलवा तर मी सोडताच नाही. आता मी माझ्या मित्रांच्या ५ ग्रीपूस मध्ये ६ व ग्रुप अद्द करायला हरकत नाही आस माझ्या मनाला सांगितला.
तसे काही प्रकार आसतात पण त्यांच्या वर आपणाला मात करायची आसते . हो मी जेन्वा आलो तेंवा आस वाटत होता कि सगळे माझ्या सोबत तर मस्त राहतात पण आपसात काही तरी प्रोब्लेम्स आहेत . आस वाटत होता रंग वाहिनी वरचा तो प्रोग्राम आसतो न बिग बोस तसा वाटत होता . पण मी ठरवला ह्या गोस्तीन कडे दुर्लक्ष करायचा . पण ऑफिस नंतर पण तोच तोच विषय ऐकल्यामुळे मला वैताग यायचा . मग एका पार्टी मधी मी सांगितला मित्रहो करपा करून त्या गोष्टी इथ काढायच्या नाहीत मग काय तेंवा पासून दुसर्यांबद्दल काही निघत नाही. अखेरीस आपण ठरलो भारतीय , भारतीय म्हटला तर हळवे असणारच , आपल्याला आपण काय नाही करतो ह्या पेक्ष्या तो /ती काय करते ह्यावर ज्यास्त भर देण्याची सवय. पण मला वाटते सगळी कडे काही न काही कारणाने दुखी आसन्या पेक्ष्या काही न काही कारणाने सुखी राहायला काय हरकत आहे . सगळे म्हणतात be +ve पण मला वाटते be +ve take +ve and try to give +ve , आता समोरचा कसा असेल ह्याचा तुमच्यावर परिणाम होईल का सांगा बरं . जर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानी ठेवल्या तर मात्र इथ सगळा एकदम मस्त.
इथे दिवसा कसे जातात हे नाही समजत , दिवसभर ऑफिस , ऑफिस हून आल्यावर कामुनीटी सेंटर मध्ये गेम्स खेळणे , दररोज न चुकता जिम ला जाने , सुट्टीच्या दिवशी कधी एकाच्या घरी जेवण तयार करून खाणे, कधी कुणासाठी शॉपिंग करायला जाने, कधी मोसिन च्या रूम वर मोठ्या प्रोजेक्टर च्या पडद्यावर वर मुव्ही पाहणे , तर कधी प्रिया, श्वेताच्या घरी पत्त्यांचा डाव मांडणे, सगळी कडे बर्फच बर्फ असल्याने जाता येत बर्फात बर्फाने खेळणे, प्रत्येक वेळी पुरू ची मज्या घेणे(पुरू मारेल एका दिवशी मला) , ह्या सगळ्या गोष्टीं मध्ये वेळ कसा जातो काही समाजात नाहीये, बाहेर जाने पिक्चर बघणे , बोलिंग करणे हे तर आहेच. आता मला सांगा कशी हो येईल आठवण घराची. आता पुढील वोळी जर लिहिल्या तर काही अतिशोक्ती कशी होणार बारा .
इथे मी आलो , माझिया देश्याहून |
गावाच्या दूर , घराला सोडून |
पार इथ मला भेटला , साथ मित्रांचा
न आठवे घर , काय हवे अधिक ह्या हून |
आता रोज आमचे गप्पा वाढत रंगत आहेत, प्रत्येकाचे खाजगी किस्स्यान पासून तर प्रथाविराज चव्हाण, मुघल सल्तनत , छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचा इतिहास सगळ्या गोष्टींवर चर्च्या रंगत आहे ( मी हे विषयां वर बोलतो आणि बोर करतो म्हणून मित्र माझ्या वर मानसिक छळ करतो ह्याचा दावा टाकणार आसं वाटते) मध्ये मध्ये राजकारणाचा विषय असतोच ( ते कसे सुटणार पाटालान कडून ) .
मला भारतातून मित्र म्हणतात पाटील अमेरिकेत पोहोचले नि पोहोचले अमेरिकेत खूप लवकर रंगले पण. पण ह्या लवकर रमण्या मध्ये एक कारण आहे , ते म्हणजे मैत्रीचा , मैत्री मध्ये दाखवलेल्या माणुसकीचा. हो माणुसकी,मी इथ येण्या आधी खूप ऐकलय कि , अमेरिकेत जाणार्या लोक माणुसकी नावाची गोष्ट विसरतात , तिथ जाऊन लोक खूप profetional होतात , कुणी कुणाचा विचार करत नसतो. पण तसा नाहीये, माणुसकी सगळीकडेच आहे पण ते तुमच्यावर आवलंबून आहे , तुमच्या वागण्यावर आवलंबून आहे , तुमच्या संस्कारावर आवलंबून आहे. आता मला हे माहिती नाही कि मी इथ आलो आणि सगळ्यांनी मदत केली , मी खूप इथ सगळ्यांत मिसळलो , सगळे मला आगदी मित्र झाले . हे सगळे माझ्या स्वभाव मुळे आहे का सगळ्यांच्या स्वभाव मुळे का आम्हा सगळ्यांतल्या भारतीय संस्कारा मूळे आहे. खरच भारतीय कुठे हि राहो त्यांचे काही चांगले संस्कार कधी विसरत नाहीत , आपसात कितीही भांडणे असोत पण मिळून मिसळून राहतात आणि एक मेकांना मदत करणे , एक मेकांना घेऊन चालणे, एक मेकांच्या सुख दुखात सहभागी होणे हे भारतीयांच्या संस्कारात बसलेलाच आहे. निदान मी हे म्हणू शकतो कि हे सगळा माझ्या संस्कारात आहे कारण मी भारतीय आहे. म्हणून म्हणतो मी कि कोण म्हणे अमेरिकेत गेल्यावर भारतीय लोक माणुसकी विसरतात , भारतीय लोक जग भ्रम्हन करतात , जगाची संस्कृतीशी जुळवून घेतात , कधी कधी जगाची संस्क्रती आत्मसात पण करतात पण माणुसकी जे आहे , भारतीयत्व ज्याला म्हणतात ते नाही विसरत . मी हे नाही म्हणत कि जिथं जिथं माणुसकी आहे तिथं तिथं भारतीय आहेच. हे पण नाही म्हणत कि माणुसकी फक्त भारतीयांतच आहे , कदाचित भारतियन पेक्ष्या इतर देश्यंत ल्या लोकांत माणुसकी ज्यास्त आहे पण मी हे नक्की म्हणेन कि जिथं जिथं भारतीय आहेत तिथ तिथ माणुसकी नावाची चीज नक्कीच आहे .

सुधाकर पाटील
तारीख २ डिसेंबर २००९