Wednesday, February 1, 2012

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणी आपलच तूनतूनं खण खण वाजतंय म्हणून ओरडू ओरडू सांगत होता तर कुणी सहकारी आणि वरिष्ठ मंडळी जे म्हणेल ते करायला तयार म्हणून शांत बसून होता . कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी कढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणण...ारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे अपेक्ष्यान वर पाणी मरावं लागलं तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून वरिष्टांना न जुमानता अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि, कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. बघू प्रचाराची रणधुमाळी कशी होईल, कोण कुणावर भारी पडेल , कोणाचे खिशे भरतील आणि कुणाचे खाली होतील
--- सुधाकर पाटील
Jan 30 2012

No comments:

Post a Comment