Friday, March 2, 2012

नांदेड जिल्हा आणि रेल्वे - १

नांदेड जिल्हा आणि रेल्वे - १ : मुंबई मध्ये २ मार्च ला मुखमंत्री महोदय नि रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी ह्यांना निमंत्रण दिलं आणि राज्यातल्या खासदारांना पण बोलावलं असं समजलं. मग वाटलं कि आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार मिटिंग ला काय नाही जाणार आणि आपल्या मागण्या कुणी नाही मांडणार . पण असं नाही झाला हो एरवी लोकसभा आणि विधानसभे मध्ये शक्यतो गैरहजर राहणारे आणि चुकून हजर राहिलेच तर सभे मध्ये चक्क झोपा काढणारे आमचे खासदार आमदार ह्या वेळेस जरासं का होईना स्वतः ची लाज राखली असं समजलं, रेल्वे मंत्री महोदय समोर आमचे खासदार महोदय आपले मौन उघडले आणि नांदेड जिल्ह्याचे रेल्वे संभधीत काही मागण्या मांडल्या. आता ते मान्य होतील व नाही होतील ते पुढची गोष्ट.
खरच काही गोष्टी नांदेड साठी अत्यंत गरजेचे आहेत. नांदेड पुणे रोज कदाचित कमीत कमी 3००० आणि वेकेंड ला तर ५००० लोकांचं येणं जानं आहे तरी एकही रेल्वे नियमित तत्वावर नाही त्यामुळे हितं travels वाल्यांचा राज्य चाललंय. आहो मला तर वाटते हे नांदेड पुणे रेल्वे चालू करू नका म्हणून travels वाल्यांचे कुठं हफ्ते जात असावेत ह्या शिष्टमंडळ ला. पण आता ती मागणी मांडली आणि ती मागणी मान्य होण्याचे संकेत आहेत त्याच बरोबर नांदेड - बिदर चे पण काम चलू कार्नायची मागणी तसेच मुदखेड परभणी दुहेरी मार्ग ह्या तीन तरी मागण्या मान्य होण्याची संकेत आहेत. नांदेड - लातूर नवीन मार्गाचे सर्वेक्षण चं पण काम होण्याचे २५ टक्के संकेत आहेत. नांदेड जिल्ह्य चे माझे खासदार आमदार महोदायानो नांदेड जिल्ह्याचे प्रत्येक अश्या गोष्टींसाठी असेच सरकार कडे सतत पाठपुरवठा करा आणि कामं करून घ्या हि विनंती -- सुधाकर पाटील आणि समस्त नांदेड जिल्ह्याचे नागरिक
३ मार्च २०१२