Wednesday, May 7, 2014

साहेब आता तरी आपण आम्हाला आपलं मानाल का !


       गाड्यांचा  ताफा फिरत होता , आरोप प्रत्यारोप , नक्कल करत सभा गाजत होत्या, विविध प्रकारच्या दस्त्या आणि टोप्या घातलेले नेते आणि कार्यकर्ते संच संच ने फिरत होते आणि एकदाचा मतदान झाला . महाराष्ट्राचा मतदान संपला . आता प्रत्येक व्यक्ती वाट पाहतोय तो १६ मे ची . प्रत्येकाला देशाचा पंतप्रधान कोण होणार ह्याचा प्रश्न पडत असतांनाच आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार ह्याची पण उस्तुकता लागली आहे … आणि त्यातलाच मी एक.  
        खरतर नांदेड मतदारसंघातून 'साहेबांचा' तिकीट फायनल झ्याल्यावर कोन्ग्रेस कार्याकार्यांचा जोश वाढला , देशात कुणाची हि हवा असो नांदेड मध्ये काही  फरक पडणार नाही म्हणून सगळे कार्यकर्ते निवांत होते. पण तसा अति विश्वास ज्यास्त दिवस नाही टिकला बरं का आणि म्हणून तर साहेबांनी प्रचार यंत्रणा जोरात चालू केली . साहेब, साहेबाच्या हाकेला हाजीर होणारे नेते आणि साहेबांसाठी दिवस रात्र एक करणारे , कष्ट करणारे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. ८ आमदार , जिल्हा परिषद चे सर्व सदश्य , महानगर पालिकेचे सर्व सदश्य , जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याच्या नगर परिषद, नगर पालिका चे सदश्य बाजार समित्या एकंदरीत सर्वच स्थानिक संस्था चे सदस्य सगळे सगळे आणि स्वतः साहेब जोरात प्रचार केले  , गावाच्या गल्ल्या गल्ल्या फिरले लोकांच्या दारा दारात जाऊन नांदेड जिल्ह्याला साहेब हेच खरे कसे हे सांगत होते. एकंदरीत नांदेड लोकसभा मतदारसंघ ला कॉंग्रेस चा एवढी प्रचंड प्रचार यंत्रणा मी तरी पाहिलं कधी पाहिलेली नाही. आणि त्या तुलनेत  भाजप  ची प्रचार यंत्रणा काहीच न्हवती. नगण्य होती.

      निवडणुकीच्या काळात नांदेड जिल्ह्या मध्ये पाऊल न टाकता पूर्ण च्या पूर्ण सत्ता  आणलेल्या साहेबांना ह्या वेळेस निवडणूक आवगढ गेली का ? , एवढ्या ताकदीनिशी प्रचार का करावा लागला ? , तालुका पातळी पासून ते जिल्हा पातळी पर्यंत तुमचीच सत्ता आसताना का एवढे कष्ट घ्यावे लागले ? .… प्रश्न पडतात ..पण मला ह्या सगळ्या खोलात जयायचं नाहीये   पण साहेब निवडणूक निकाल आल्यानंतर मतदान चे गणित(Analysis)  केल्या नंतर पडलेल्या मतदाना मुळे निवडून आल्या मुळे  आपणास मतदान करणाऱ्या मतदारांचा आपण आभार मानालच  पण न पडलेले मत का पडले नसावे ह्याचा विचार कराल का ? अख्या नांदेड जिल्ह्या बाद्दल मी काही म्हणणार नाही पण साहेब ''माझ्या, आमच्या''  धर्माबाद तालुक्यातून' न पडलेल्या मतदान बाद्दल कृपया विचार करा (मला इथे धर्माबाद तालुक्याला आपलं म्हणावं कि आमचा म्हणावं हे आजूनही काळात नाहीये ). धर्माबाद तालुक्यातून जे काही आपणास मत पडलं नसेल त्या न पडलेल्या मतांचं कारण तुम्ही शोधण्याचा कृपया प्रयत्न कराल का ?. जे काही टक्के मत नाही पडला त्याचं कारण काय नमो ची हवा असावं ? काय राष्ट्रवादी चे नेते कार्यकर्ते धोका दिले असावेत ?, का आपल्याच प्रचार यंत्रणेत कमतरता होती ? …… का धर्माबाद तालुक्याच्या (तुम्हाला मत न टाकलेल्या लोकांचा ) तुमच्यावर चा राग असावा ?

     साहेब ,मी काही पत्रकार नाहीये , नाही कुणी नेता , कार्यकर्ता , पण माझ्या Analysis नुसार ते थोड्या प्रमाणात हवा तर थोड्या प्रमाणात उलटी हवा होती     मग उलटी हवा का होती ? , का लोकांना राग यायला पाहिजे ? .. कारण साहेब आम्हा धर्माबाद तालुका वासियांना वाटतं आपण आम्हाला आपलं समजतच नाही. नाही समजत तुम्ही आम्हाला आपलं. आपलं  समजत असाल तर अशी वागणूक दिलीच नसती आम्हाला.
     प्रचार  दरम्यान एका NSUI  च्या सभेत एक विद्यार्थी आपणास प्रश्न विचारला म्हणे  कि भोकर तालुक्या  प्रमाणे आमच्या तालुक्याचा विकास का नाही झाला आणि आपण  उत्तर दिलात "मी भोकर चा विधानसभेचा उमेदवार होतो इथला नाही । आता मी नांदेड लोकसभेचा उमेदवार आहे आता आलो आहे मी तुमच्या कडे आता पहा कसा विकास करेन इथचा"  पहिली गोष्ट तर भोकर चा काय विकास झाला हे मला नाही माहिती आणि दुसरी गोष्ट  तुमच्या बोलण्या वरून आस वाटतं  " आपण आम्हाला (बाकीच्या तालुक्यांना ) आपला कधी समजलच नाही ?? आम्हीच वेडे  तुम्हाला आपले समजत आलो , आपण हात दिलात त्यांना आम्ही मत देत आलोत पण  काय पडलं  आमच्या पदरात ???? काय ?
    
     आदरणीय ,माननीय कै. शंकरराव चव्हान साहेबांच्या  इच्या शक्ती तून साकार कारखाना उभा होता , माननीय कै. लक्ष्मनराव हस्सेकर ह्यांच्या मेहनती तून कारखाना चालत होता  , मुबलक प्रमाणात पाणी नसताना १००० ते २००० एक्कर जमिनीवर शेतकरी उस लावत होता . आज आदरणीय ,माननीय कै. शंकरराव चव्हान साहेबांच्या कल्पनेतून बाभळी बंधारा उभा आहे ( कृपया ह्या साठी आता आपण प्रयत्न केलात आस म्हणू नका ) पाणी भरपूर आहे पण कारखान्याच्या वाटोळे पणा मुळे  शेतकरी उस लावणेच सोडला. लहान पण पासून ऐकत आलोत  नांदेड ते उमरी - जुन्नी - धर्माबाद मार्ग बासर राष्ट्रीय महामार्ग ४४ होणार पण काय आमचं आमचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं . धर्माबाद च्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडा संकुल का झाला नाही (का कुठे गेला आसे विचारायला पाहिजे ? ) , अनेक वर्षा पासून जागा असून चांगला ग्रामीण रुग्णालय नाही हो साहेब. क्रिटिकल वळेस लोक आधी दवाखान्यात जातात मग तिथे सेवा नसल्यामुळे नांदेड ला हलवायचा सल्ला मिळतो मग काय धर्माबाद हून नांदेड ला जाणारे रस्ते कसे आहेत हे माहीतच आहे … नांदेड गाठे पर्यंत त्या रुग्णाचा जीव ….... :( .... बरं जागा असून रुग्णालय होत नाहीये आणि आता मिरची प्रकीर्या केंद्र जागा नसण्याचा  कारण दाखवून धर्माबाद हून हलवायचा प्रयत्न होत आहे आसे समाजत आहे …. कसं करायचं साहेब धर्माबाद तालुका लोकांनी .
   धर्माबाद तालुकाचे रस्ते ह्या बदल तर काय बोलावे … आपणास देवगिरी ने यावे लागते ह्यातच सगळा उत्तर आहे. किती दिवस टिकतील माहित नाही पण आता काही छोटे रस्ते होत आहेत पण साहेब किती दिवस रस्ते बंधने परत त्याच गुत्तेदार च्या जड वाहन वाहतुकीमुळे खराब करणे पुन्हा बंधने ह्यालाच विकास म्हणायचा . ठीक आहे लोकल आमदार लोकांचे लोकल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत करत आहेत ,
जितकं त्यांना शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केले आणि करत आहेत  लोकांच्या सुख दुखात तरी हाजीर राहतात पण साहेब खासदार महोदय  चा काय काम आसतं हे ह्या तालुक्याला आजूनही समजलं नाहीये  ,समजत नाहीये हो.    

आपण आता पर्यंत आम्हाला आपलं कधी मानलच नव्हतं आसं मला तरी वाटतं पण साहेब एकच कळकळीची विनंती आहे , जे काही मत पडला नाही त्यात हवा असणे हे असून सुधा थोडा बहोत का होईना तुमच्यावरचा राग पण आसू शकतो ह्याचा कृपया विचार करा , आणि कोणताही माणूस आपल्या माणसावरच राग मानतो …. आपला समजतो त्याच्यावरच राग येतो ,  आम्ही धर्माबादी आपणास आपले मानत होतो , आत्ताही आपले मानतोच पण तोच धर्माबादी तुम्ही आता तरी आमच्या कडे लक्ष द्याल आता तरी आम्हाला आपलं मानाल ह्याच आशेवर टिकून आहे कृपया आता तरी आपण आमच्या कडे लक्ष द्याल का , आता तरी रस्ते बांधणे खराब होणे पुन्हा बांधणे ह्याच्या पेक्षा पुढे विकासाची व्याख्या जाईल का  ? आता तरी " आमच्या " तालुक्याचा शेतकरी पायावर उभा राहील का ?  .. आता तरी आपण आम्हाला आपलं मानाल का,  ? आतातरी आपण आम्हाला आपल्या ची वागणूक द्याल का ?

सुधाकर पाटील
७ मे २०१४ 
      

Sunday, October 14, 2012

नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणूक

नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणूक

आज नांदेड वाघाळा महानगर पालिका साठी रणशिंग फुंकलेल्या सगळ्या योध्याचं ( योध्याचं म्हणायचं का आणखी काय म्हणायचं ह्या साठी खूप विचार केला पण शब्द दुसरा भेटला नाही किंवा मी लिहू शकलो नाही म्हणून तुम्ही योद्धे चं समजा ) ... तर रणशिंग फुंकलेल्या योध्याचं नशीब ... नशीब ठरवणाऱ्या मशीन मध्ये बंद झालं . ७-८ दिवसां पासून चालत आसलेल्या रणधुमाळीत कळलं कि धुरा सारखा पैसा उधळल्या गेला, उधळाय लाच पाहिजे. नांदेड च्या धुळी पासून बनवलेला पैसा धुरा सारखा निवडणुकीत उधळायलाच पाहिजे... आसो. तर नांदेड महानगर पालिकेची ची हि निवडणूक जरी बाकी निवडणूक सारखी दर पाच वर्षांनी येणारी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे. ..... रोज एक कॉंग्रेस चा घोटाळा बाहेर येत आसला ..... लोक दर मिनिटाला जरी कॉंग्रेस ला हटवा म्हणत असले ... जरी लोकांना देशात आता कॉंग्रेस ला पर्याय शोधावासा वाटत आसला .... एकंदरीत सध्या देशा मध्ये कॉंग्रेस ची परिस्तिथी हलाकीची झालेली असली तरी आम्हा नांदेड(शहर) करांना एवढं कळून चुकलंय कि नांदेड मध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. नांदेड चा प्रत्येक युवक जरी रोज फेसबुक वर कॉंग्रेस ला शिव्या घालत आसला तरी आज तो जावून हाताच्या पंज्यालाच शिक्का मारला असेल .... खरच ह्या गोष्टीचा नांदेड करांचा 'आदर्श' बाकी भारतीय लोकांना घेयायलाच पाहिजे ..... आता तुम्ही उगीच विर्यारू नका ....कि का नांदेड करांच्या मनात एवढं कॉंग्रेसस चा 'आदर्श' ???? ..... कारण एकच ....'माननीय माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण . होय आम्ही नांदेड करांना जरी माहित आसले कि अशोक रावांना 'आदर्श' मुळे मुख्य मंत्री पदावरून पायउतार करावे लागले तरी आम्ही त्यांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन (मुंबई च्या आदर्श वर काना डोळा करून) त्यांनी वेचलेल्या उमेदवारालाच च मतदान करू आणि पुन्हा दाखवून देऊ कि होय नांदेड मध्ये अशोक राव साहेबांचे वर्चस्व आहे, आणि कॉंग्रेस च्या हाय कमांड ला सांगू कि बाई साहेब आज मराठवाड्या साठी न्हावे तर महाराष्ट्र साठी कॉंग्रेस पुढे एकच पर्याय आहे .....तो म्हणजे माननीय अशोकराव जी चव्हाण.
आणि हेही खरच आहे नांदेड चे भलेही अर्धे रस्ते उखडलेले आसले , ३ वर्ष पासून नांदेड कर जागो जागी उखडून ठेवलेल्या रस्त्यांची नुसती धूळ खात आसले, जरी त्याच धुळीतून नेत्यांच्या नवनवीन गाड्या लोकांवर धूळ उधळत सुसाट धावत असल्या जात असल्या लोकांच्या तरी थोडा बहोत का होईना नांदेड चा विकास झाला खरा . मला तरी वाटते खरच नांदेड चा विकास झाला .... पण ह्याहून हे ज्यास्त वाटते कि जर नांदेड चा म्हणजे नांदेड शहराचा ह्या पुढे विकास बघायचा असेल तर खरच अशोकराव जिंदाबाद म्हनाव्हाच लागेल मग भले हि कुणी कोणत्याही पक्षाचा समर्थक आसू देत.
.... मला हे पण वाटते कि जसा विचार मी करत आहे तसाच विचार नांदेड करांनी आज केला असेल, आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही उमेदवारांचा व्यक्तिगत प्रभाव सोडला तर बाकी बहुतांश उमेदवारान साठी ज्या पंज्यावर लोकांनी आज शिक्का मारला तो पंज्या कुणाचा आहे ते न पाहता अशोकराव चा पंज्या समजून पंज्या वर शिक्का मारला आसावा. आणि म्हणूनच उद्या पुन्हा एकदा कॉंग्रेस चा झेंडा नांदेड वाघाळा महानगर पालिकेवर फडकेल हे निच्चीत .
सुधाकर पाटील
१४ ऑक्टोंबर २०१२

आज नांदेड वाघाळा महानगर पालिका साठी रणशिंग फुंकलेल्या सगळ्या योध्याचं ( योध्याचं म्हणायचं का आणखी काय म्हणायचं ह्या साठी खूप विचार केला पण शब्द दुसरा भेटला नाही किंवा मी लिहू शकलो नाही म्हणून तुम्ही योद्धे चं समजा ) ... तर रणशिंग फुंकलेल्या योध्याचं नशीब ... नशीब ठरवणाऱ्या मशीन मध्ये बंद झालं . ७-८ दिवसां पासून चालत आसलेल्या रणधुमाळीत कळलं कि धुरा सारखा पैसा उधळल्या गेला, उधळाय लाच पाहिजे. नांदेड च्या धुळी पासून बनवलेला पैसा धुरा सारखा निवडणुकीत उधळायलाच पाहिजे... आसो. तर नांदेड महानगर पालिकेची ची हि निवडणूक जरी बाकी निवडणूक सारखी दर पाच वर्षांनी येणारी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे. ..... रोज एक कॉंग्रेस चा घोटाळा बाहेर येत आसला ..... लोक दर मिनिटाला जरी कॉंग्रेस ला हटवा म्हणत असले ... जरी लोकांना देशात आता कॉंग्रेस ला पर्याय शोधावासा वाटत आसला .... एकंदरीत सध्या देशा मध्ये कॉंग्रेस ची परिस्तिथी हलाकीची झालेली असली तरी आम्हा नांदेड(शहर) करांना एवढं कळून चुकलंय कि नांदेड मध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. नांदेड चा प्रत्येक युवक जरी रोज फेसबुक वर कॉंग्रेस ला शिव्या घालत आसला तरी आज तो जावून हाताच्या पंज्यालाच शिक्का मारला असेल .... खरच ह्या गोष्टीचा नांदेड करांचा 'आदर्श' बाकी भारतीय लोकांना घेयायलाच पाहिजे ..... आता तुम्ही उगीच विर्यारू नका ....कि का नांदेड करांच्या मनात एवढं कॉंग्रेसस चा 'आदर्श' ???? ..... कारण एकच ....'माननीय माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण . होय आम्ही नांदेड करांना जरी माहित आसले कि अशोक रावांना 'आदर्श' मुळे मुख्य मंत्री पदावरून पायउतार करावे लागले तरी आम्ही त्यांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन (मुंबई च्या आदर्श वर काना डोळा करून) त्यांनी वेचलेल्या उमेदवारालाच च मतदान करू आणि पुन्हा दाखवून देऊ कि होय नांदेड मध्ये अशोक राव साहेबांचे वर्चस्व आहे, आणि कॉंग्रेस च्या हाय कमांड ला सांगू कि बाई साहेब आज मराठवाड्या साठी न्हावे तर महाराष्ट्र साठी कॉंग्रेस पुढे एकच पर्याय आहे .....तो म्हणजे माननीय अशोकराव जी चव्हाण.
आणि हेही खरच आहे नांदेड चे भलेही अर्धे रस्ते उखडलेले आसले , ३ वर्ष पासून नांदेड कर जागो जागी उखडून ठेवलेल्या रस्त्यांची नुसती धूळ खात आसले, जरी त्याच धुळीतून नेत्यांच्या नवनवीन गाड्या लोकांवर धूळ उधळत सुसाट धावत असल्या जात असल्या लोकांच्या तरी थोडा बहोत का होईना नांदेड चा विकास झाला खरा . मला तरी वाटते खरच नांदेड चा विकास झाला .... पण ह्याहून हे ज्यास्त वाटते कि जर नांदेड चा म्हणजे नांदेड शहराचा ह्या पुढे विकास बघायचा असेल तर खरच अशोकराव जिंदाबाद म्हनाव्हाच लागेल मग भले हि कुणी कोणत्याही पक्षाचा समर्थक आसू देत.
.... मला हे पण वाटते कि जसा विचार मी करत आहे तसाच विचार नांदेड करांनी आज केला असेल, आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही उमेदवारांचा व्यक्तिगत प्रभाव सोडला तर बाकी बहुतांश उमेदवारान साठी ज्या पंज्यावर लोकांनी आज शिक्का मारला तो पंज्या कुणाचा आहे ते न पाहता अशोकराव चा पंज्या समजून पंज्या वर शिक्का मारला आसावा. आणि म्हणूनच उद्या पुन्हा एकदा कॉंग्रेस चा झेंडा नांदेड वाघाळा महानगर पालिकेवर फडकेल हे निच्चीत .

सुधाकर पाटील
१४ ऑक्टोंबर २०१२

Wednesday, September 5, 2012

नोकरी बढती मध्ये आरक्षण

होय आरक्षण ला आमचा विरोध नाही
------------------
होय आरक्षण देण्याचा उदेश चांगलाच होता, त्या वेळेस एखाद्या समाजाची परिस्तिथी खूप बिकट होती , त्या समाजाबद्दलचे विचार हे खूप खालावलेले होते आणि त्या मुळेच ह्या परिस्तिथी ला तोंड देणारे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात ह्याची नोंद घेतली, वंचित समाजासाठी आरक्षण असायला पाहिजे ज्या मुळे वंचित समाज वर येईल आणि एक भक्कम भारत निर्माण होईल हाच त्यांचा उदेश होता . मला एवढंच म्हणायचं आहे त्यांचा उदेश चांगलाच होता पण आता हे जे काही चाललय ह्या राजकीय नेत्यांचा उदेश हा एक वेगळाच आहे . लोकांनी हे समजून घेयायला पाहिजे दोन्ही विचारांची तुलना होऊच शकत नाही. समाजातील विसंगत पना दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात नोंद घेतली होती आणि आता हे जे काही चाललंय ह्या मुळे समाजातला विसंगत पना दूर होणे तर दूरच पण ह्या उलट विसंगत पना वाढण्याला खत पाणी घालण्याचं काम चाललंय.

आता नोकरी मध्ये बढती देण्या च्या विधेयक बदल बोलायचा झालं तर ..... ह्यात फक्त राजकीय हेतू आहे असच मला वाटते ..... हे तर आसं झालं कि मुलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना आरक्षण दिला आणि पुढ प्रत्येक परीक्षे मध्ये आरक्षण , पहिल्या वर्ष्यातून दुसर्या वर्षी प्रवेश करताना पण आरक्षण , आणि दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या... ( आता तेच उरलाय ... खरच तिथ पण आरक्षण आणतील हे लोक .... आहो खुल्या वर्गाला पूर्ण विषय पास होणे गरजेचे तर, आरक्षण मुळे ४ विषय मध्ये नापास जरी झाले तरी पुढच्या वर्ष्यात प्रवेश आणि त्यांना ते ४ विषय मध्ये पास होण्याची गरज सुधा नाही ...... आसं पण करतील हे लोक ) ..... खरच एक वेळेस नोकरी लागली तर पुढ त्यांना कश्याला पाहिजे हो आरक्षण ? ... स्वतः च्या कार्यक्षमते च्या आधारावरच बढती होणे गरजेचे नाही का ?. आणि ह्या वर्गातील जे लोक नोकरी करत आहेत खरच त्यांना स्वतः ला पण वाटत असेल कि नकोय त्यांना आरक्षण ... पण ह्या राजकीय नेत्यांना पाहिजे ना . मला मान्य आहे पिच्याड्लेल्या समाजाला समाजातल्या व्यक्तींना समोर येण्या साठी आरक्षण गरज आहे पण मग काय बढती साठी पण ....

एक म्हण आहे ' एखाद्याला पाण्या जवळ नेऊ शकतो पण त्याला पाणी स्वतःच प्यावे लागेल' ...... इथं आरक्षण च्या बाबतीत उलट होत आहे .. एखाद्या ला पाण्या जवळ तर नेतच आहेत (ते पण ५ लोकांच्या खांद्यावर उचलून ) आणि पाण्या जवळ नेऊन पण तो पाणी पीत नसेल तर त्याच्या तोंडात पाणी टाकल्या जात आहे .... पुढ चालून मग काही दिवसांनी आसं होईल कि तो पाणी gitaknar नाही मग हे लोक त्याच्या नरड्यात नळी टाकून पाणी पाजावायचा प्रत्न करतील . एका वाक्यात बोलायचा असेल तर आरक्षण च्या बाबतीत राजकारण करू नये , डॉक्टर बाबासाहेबांचे निस्वार्थ आणि दूरदृष्टी उदेश समजून घ्यावे , बघावे कि खरच कोणत्या लोकांना आरक्षण ची गरज आहे , आणि आरक्षण देऊन लोकांना पाण्याजवळ नेण्यात यावे , पाण्याजवळ जाण्याची क्षमता द्यावी , त्याला पाणी पिण्यास सक्षम करावे पण पाणी पाजे पर्यंत आरक्षण नको .........

आजून एक खूप मोठा विषय हा पण आहे कि आरक्षण चा लाभ खरच गरजूंना होत आहे का ??? , कि आरक्षण च्या मुद्याचा लाभ हे राजकीय लोकांना ????? . गरजून पर्यंत आरक्षण चा लाभ जात आहे का ?? कि राजकीय लोक, राजकीय पार्टी पर्यंत आरक्षण च्या मुद्याचा लाभ ??? ….

मित्रहो म्हणूनच म्हणतो माझा विरोध आरक्षण ला मुळीच नाहीये , आरक्षण च्या मूळ उदेष्याला तर नाहीच नाही ..... पण ह्या आरक्षण वरनं जे काही राजकारण चाललय त्याचा वीट आलाय.

सुधाकर पाटील
६ सप्टेंबर २०१२

Sunday, June 17, 2012दोन पुढाऱ्यांचा संभाषण
---------------------------
काहीच दिवस झाले माझ्या तिकीटा बदल ची कहाणी मी सांगितलीच तुम्हाला..... त्याच तिकीटा बदल विचार करत होतो आणि
मग कॉल आला ... एका फोन चा cross connection झाला.... आणि दोन राजकारणी पुढाऱ्यांचा संवाद कानावर पडला ........एक बोलत होता दुसर्याला

... आपणच दोघे तिकीट घेऊ, आरे ऐक ना आपणच दोघे तिकीट घेऊ
उगीच तिसर्याला chance द्यायचा कश्याला
मी अर्धे मतं खातो , तू अर्धे मतं खा
खाण्याचं काम आपणच करू , तिसर्याचं पोट भरवायचं कश्याला.

आपणच दोघे, एकमेका विरोधात प्रचार करू
तिसर्याला प्रचारात मिरवू द्यायचं कश्याला
मी तुला बोलतो , तू मला बोल
चिखलात खेळायची सवयच आपल्याला , तिसऱ्या ला चिखलात भरवायचं कश्याला

वेळ प्रसंगी, आपणच प्रचारात एकमेकांना मारून पण घेऊ
उगाच लोकांना शंका कश्याला ..
मी करतो मारल्या सारखं, तू कर लागल्या सारखं
मधून येवढं तूझं माझं जमत आसताना , वरनं मित्रत्व दाखवायचा कश्याला..

निवडणूक झाल्यावर , दोघे मिळून काम करू ,
एक मेकांच्या धंद्या ची वाट लावायची कश्याला
तू निवडून आला तर , मी म्हटलं तिथ तू सही कर
मी निवडून आलो तर , तू म्हटलं तिथ मी सही करतो
दोघांचे गोदाम भरत असतांना , उगाच खिश्याला कडकी कश्याला ...

आपल्या ताटातून उरलेलं खाणारे , कुत्रे पण तेच ठेऊ
उगच तिसऱ्या कुत्राला, मटणाचा वास देयायचा कश्याला
तू सत्तेत आला तर २ कुत्रे तुझ्या साठी भुंकतील
मी सत्तेत आलो तर तेच कुत्रे माझ्या साठी भुंकतील
सगळी कडे आपलीच मक्तेदारी असताना , तिसऱ्या गुत्तेदाराला तयार करायचच कश्याला ...

म्हणूनच म्हणतो , दोघे मिळून तिकीट घेऊ
उगीच तिसऱ्याला, chance द्यायचं कश्याला
मी हाताला घड्याळ बांधतो, तू हात वर कर
हातावरच घड्याळ बांधलेली असतांना , इन्जीन म्हधला धूर किंवा धनुष्याची बाण सुटू द्यायची कश्याला
सुधाकर पाटील
जून १६ २०१२

Friday, June 8, 2012

आशी घडली माझ्या तिकीटाची कहाणी

आशी घडली माझ्या तिकीटाची कहाणी
२०१४ साठी तिकीट वाटप विचार मंथन सुरु होते... आणि मला आला फोन
मलाच आश्चर्य वाटले... अरे मला तिकीट देतय तरी कोण ?

मुंडे म्हणाले भावू या आजच तिकीट घेवून जा
... पांढर्या शुभ्र कमळाला, तुमचा भक्कम आधार द्या
नांदेड जिल्ह्या मध्ये भाजप चा तुम्हीच व्हा वाली
तुमच्या सारख्या तरुण तडपदार नेत्यांची काढा एक र्याली

पुन्हा फोन वाजला तेव्हा आमच्या सौ ने फोन उचलला
नांदेड वरून अशोकरावांच्या सौ. चा फोन ? … आमच्या सौ चा भाव वधारला
गावभर ती सांगत फिरली, याचं हवाय कॉंग्रेसला हात
चीखालीकरणे दाखवले दात यांचीच आता अशोकराव साहेबांना साथ
दुपार होत नाही आणि शंकर आणा स्वतः फोनवर बोलले
माझा होकार नकार मिळण्यापूर्वी.. कोंबडी वडे धाडले

वामकुशी घेता घेता K K साहेबांचा आला फोन
होते न्हवते सगळे अधिकार सोडले.....सोडा आता मौन
पाहून माझे मौन, फोनवर गोरठेकर साहेब बोलले
गेला आमचा हातातला मतदारसंघ, आत्ता नाटक पुरे म्हटले
म्हटले, “उठा सुधाकरराव तुमची पाहिजे आम्हाला साथ
गेलेला गढ आमुचा.. पहायचय आम्हाला आता तुमच्या हातात “
भास्कररावांसारखे हु हु करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले
नांदेड चे खासदार म्हनून घेण्या पलीकडे ह्यांनी काय केले
डोळा जरा लागत नाही , आमचे वसंतराव च बोलले
तिकीटाचं काय एक कॉलेज च देतो .. शांत आवाजात कोकालले

आता मला कळून आले मला आलाय डिमांड
मला वाटलं एकेकाचं आता घेतला पाहिजे कमांड
नावातल्या साधर्म्याने फोनवर फोन आले
सावंत सरने तर देगलूरचे तिकीट दिल्याचे, लगेचच सांगितले
संध्याकाळी पाय मोकळे करू असे मनासी म्हटले
रस्त्यावर उतरतो तर आन्तापुरकर वाटेतच भेटले
मी राम राम करणार तो हातच त्यांनी धरले
म्हटले काल पर्यंतचा मुंबई मधला व्यापारी मी
आताच कुठे देगलूर ला घाठले ,
सांगून त्यांची कहाणी
देगलूर ला चुकून न येण्याचा वाचनच, माझ्या काढणं घेतले

आता काय करावे खरच मला कळत नाही
हि म्हणते लढून पहा एकदाची लढाई
शिंप्याने एक सदरा शिवला त्याचे रंग दहा
एक सत्तेचा लालची त्याच्या सतरा तर्हा
त्यातलाच एक रंग, होता आवडायला लागला
तेवढ्यात माझा डोळा धाडकन उघडला

कळलं मला राजकारणात कायबी खरं नाही
मानसं कधी बदलतात याची नसते ग्वाही
डोळस असून मला काही कळत नाही
मत देताच पुसली जाते हाताची शाई
वाटतं आपल्यालाच करावे लागेल आता तरी काही
सगळा धिंगाणा उघड्या डोळ्याने आता पाहवत नाही
- सुधाकर पाटील
३१ मे २०१२
(संधर्भ: मूळ कविता 'तिकीट ' कोचरेकर मंगेश)

Tuesday, May 1, 2012


नसतेस सोबत तू जेन्वा

नसतेस सोबत तू जेन्वा
जीव तुटका तुटका होतो ,
सगळ्यात बसून असताना
...उगाच भटकून येतो

नसतेस सोबत तू जेन्वा
मन तुझ्याच आठवणी रंगवतो
आठवणीत तुझ्या रमताना
उणीवेची तुझ्या
जाणीव करुनी तो देतो

नसतेस सोबत तू जेन्वा
काळीज ठोके थांबवतो
तुझ्या प्रेम स्पर्शाची
जणू वाट तो पाहतो

नसतेस सोबत तू जेन्वा
गाल चिंब चिंब होतात
डोळे हे वेडे रोज ...
अश्रू नाही
तर पाणीच ते ओकतात

नसतेस सोबत तू जेन्वा
घर सुनं सुनं वाटतो
एकटा मला पाहून
मलाच गिळण्यास उठतो

नसतेस सोबत तू जेन्वा
वेळ माझ्या शी भांडतो
भेटाल कधी आपण
रोज मला तो विचारतो

------ सुधाकर पाटील 
         १ मे २०१२
हातोडा - नांदेड जिल्हा

सध्या नांदेड जिल्ह्या मध्ये अतिक्रमण हटाव 'हातोडा' मोहीम खूप चर्चेत आहे . आस समजलं कि बाकी सगळ्या मोहिमेच्या "successful implementation " नंतर हि पण मोहीम success झाली आहे . लोकांनी पण तेवढाच प्रतिसाद देत आहेत , मोहिमेचा मुख्य भाग म्हणजे ह्या मोहिमेला लोकांनी मोठा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दाखवत आहेत आणि स्वत आपले अतिक्रमण हटवत आहेत. जिल्हाधिकारी नि हाती घेतलेले कॉपीमुक्त जिल...्हा , पडतापासनी आणि आता हि हातोडा मोहीम सगळ्याच मोहीम खूप व्यवस्तीत रित्या हाताळल्या गेल्या. खरच मागील ३ वर्ष्यात पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी ची कामगिरी तारीफ करण्याजोगी आहे . पण हे सगळे सगळ्याच लोकांना आवडेल आसे नाही, जिल्हाधिकारी च्या ह्या मोहिमे मुळे काही लोकांच्या पोटात कळ येत आहे आस समजलं. ते तर होणारच एखादा प्रशासकीय अधिकारी चांगला, निस्वार्थी आला सगळ्यात आधी पोट दुखतं ते राजकीय नेत्यांचं. आता फुकट आणि अनेक अव्यध मार्गाने अवाढव्य वाढलेल्या पोटावर लाथ बसत असेल तर पोट हे दुखणारच. काय तर म्हणे हे अश्या मोहिमे मुळे नांदेड जिल्ह्याचा विकास होत नाहीये , आरे मग कश्याने होतो विकास. तुमच्या फक्त कागदोपत्री शाळा, कागदोपत्री शिक्षक आसलेल्या आणि कागदोपत्री शाळेतून निघेले मुलं... हे आहे का विकास? कि कुठे पण अव्याध्य रित्या इमारती उभे करून रहदारीची कोंडी करणे हे आहे विकास ? ... हो असणारच कारण विकास पण तुम्ही कागदोपत्री दाखवता न ... मग तुम्हाला कॉपी मुक्त आणि पडतापासनी ची झळ हे लागणारच. वरून आता हे 'हातोडा' ... जे लोक (लोक म्हणजे राजकीय लोक बरं का ) ह्या मोहिमेला विरोध करत आहेत आणि शिष्टमंडळ घेऊन मुख्य मंत्री महोदय ला भेटणार आहेत नं, त्या लोकांच्या नक्कीच अव्यध जागेवर , अव्यध बांधलेल्या बगला, दुकानाचा गाळा आणि even शाळा कॉलेगे च्या इमारतीवर हातोडा पडत किंवा पडणार असेल .... म्हणूनच हि नाकदुखी चाललीये. आरे हो बरोबरच आहे , आता हे सगळा पडला तर मग विकास कसा होणार, सगळेच धंदे बंध झाले तर मग पैसा कसा येणार .... मग २ वर्ष्यावर आलेल्या election ची ताराजोड कशी होणार ....बाबानो तुम्ही तर कधी काही अभिमानाने सांगण्या जोगं काम नाही करत ( प्रत्येकाच्या लग्न , कार्यक्रम मध्ये जाऊन शाल घेण्याच्या व्यतिरिक्त - ते काम मात्र तुम्ही किंवा तुमचे पोरं बाळं अगदी उत्तम प्रकारे पार पडता बरं का ... खरच मानावे लागेल ). आता काही प्रशासकीय अधिकारी करतायत चांगलं काम तर करू द्या नं उगाच का नुसत्या उठाठेव करताय ????????.

सुधाकर पाटील
एप्रिल ४ २०१२