Sunday, August 29, 2010

मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पुन्हा एकदा जावसं वाटतं मैदानात
पुन्हा एकदा भिजावंसं वाटतं पावसात
पुन्हा एकदा खावंसं वाटतं कांदा भाजी
पुन्हा एकदा माखवसं वाटतं जिलेबी ताजी
कांदा भाजी खातांना, जिलेबी ताजी मखताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पाणी असेल टपकत तुजया अलकांतून
खेळत असेल ते गालफटाच्या खळीतून
एक थेंब बसला असेल तुज्या ओठावर
घेशील त्यास आत, जगत असेल तो त्या आशेवर
केसांत पाणी खेळताना, ओठाशी पाणी बोलताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

वाहत आसतील धो धो पावसाच्या सरी
येत आसतील खालच्या वाड्याच्या दारी
सोडत आसशील त्यात तू कागदाच्या ओढी
करत आसतील त्या ब्राम्हदाच्या वारी
सरी दारात येताना, ओढी त्यात सोडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

इथं अंबरात कडकडत्या विजा जेन्वा थरारक जमकतात
नेमकी तुझ्या वूनिवेची जणू जाणीव करून देतात
माझ्या सारखाच आभाळाहि त्यांचा खूप राग येतो
मला समजावताना माझ्या पेक्ष्या तोच रडून निघतो
नाही होत सहन आता , बघून आक्ख अंतराळ रडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

सुधाकर पाटील
तारीख : २९ ऑगस्ट २०१०

Thursday, August 12, 2010

एक मैत्रीण !!

इथ नं मला
एक पोरगी भेटली

आधी नं जराशी
ती नाटकीच वाटली

सुरुवातीला नं ती
जरा ज्यास्तच थाटली

पण आता आमच्या दोघांची
फ्रिक्वेन्सीच पटली

पण तिच्या नाकावर
भलताच राग
चष्म्याने खाला नाकाचा
आर्धा भाग

दोन गोष्टी ती
सतत सोबत घेऊन फिरते
कुणास ठाऊक येव्हाडा वजन
नाक कसं सहन करते

आहे दिसायला
जराशी ती सावळी
पण मानाने आहे
ती खूपच हळवी

जितकी आहे ती
दिसायला बारकी
तितकीच दिसेल
तुम्हाला ती बोलकी

पण सगळ्यांनाच ती
नाही हो बोलत
सगळ्यांनाच आपलासा
नाही हो ती करत

मोजकेच तिचे मित्र आसतात
पण जे आसतात ते पक्केच बनतात

मित्र कुणाला बनवायचं ...
हक्क ह्याचा
फक्त तिलाच आहे
मी पण तिचा मित्र ...
आनंद ह्याचा
मला मात्र खूपच आहे

सुधाकर पाटील
तारीख : २६ जुलै २०१०

ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव !!

काही केल्या आता वेळ माझा पळेना
गेले कसे दोन महिने मला ते कळेना
खालील भावना तुला बोलल्याविना
चष्मा, मला आता राहवेना

गेली माझी मैत्रीण,
विचार करूनच डोकं माजं ठणकतं
गेली कुठे तुझी मैत्रीण
रोज रोज मला रोज ते विचारतं
नाहीयेस तू इथे ,
विचार करून वस्तुस्तीचा, परत भानावर येतं
माझ्याशी बोलतं आणि हळूच म्हणतं

आयुष्याच्या प्रवासात
मानसं भेटतात आणि दुरावतात देखील
नाती जुळतात आणि तुटतात देखील
ओळखी वाढतात आणि विसरतात देखील
आठवणी रंगतात आणि पुसतात देखील
मैत्री करतात आणि तोडतात देखील

पण आसे आपले म्हणणारे जेम तेमच भेटतात
बिना श्याई च्या लेखणीने आखी डायरीच लिहून काढतात
एकच आहोत आपण आसं ओराढू ओराढू सांगतात
आणि आपल्या डायरीचा एक ते भागच बनतात

त्याच डायरीतला तू एक पान बनली आहेस
जशी आहेस तशी खूप छान आहेस

जवळची मैत्रीण म्हणनार्या पैखी मला तू भेटली
थोड्याच दिवसात आपण आपली सुख दुख वाटली
आठवणी आपल्या मैत्रीचे एका कोपऱ्यात साठली
तू जाताना मात्र माझी कंठ दाठली

जाता जाता माझी एकच विनंती करतो
विनंती कसली तुझ्या समोर माझा ते हक्कच बनतो
आयुष्यात तुझ्या ह्या मित्राची हमेशा आठवण ठेव
ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव
तुझा मित्र सुधाकर