Sunday, August 29, 2010

मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पुन्हा एकदा जावसं वाटतं मैदानात
पुन्हा एकदा भिजावंसं वाटतं पावसात
पुन्हा एकदा खावंसं वाटतं कांदा भाजी
पुन्हा एकदा माखवसं वाटतं जिलेबी ताजी
कांदा भाजी खातांना, जिलेबी ताजी मखताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पाणी असेल टपकत तुजया अलकांतून
खेळत असेल ते गालफटाच्या खळीतून
एक थेंब बसला असेल तुज्या ओठावर
घेशील त्यास आत, जगत असेल तो त्या आशेवर
केसांत पाणी खेळताना, ओठाशी पाणी बोलताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

वाहत आसतील धो धो पावसाच्या सरी
येत आसतील खालच्या वाड्याच्या दारी
सोडत आसशील त्यात तू कागदाच्या ओढी
करत आसतील त्या ब्राम्हदाच्या वारी
सरी दारात येताना, ओढी त्यात सोडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

इथं अंबरात कडकडत्या विजा जेन्वा थरारक जमकतात
नेमकी तुझ्या वूनिवेची जणू जाणीव करून देतात
माझ्या सारखाच आभाळाहि त्यांचा खूप राग येतो
मला समजावताना माझ्या पेक्ष्या तोच रडून निघतो
नाही होत सहन आता , बघून आक्ख अंतराळ रडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

सुधाकर पाटील
तारीख : २९ ऑगस्ट २०१०

No comments:

Post a Comment