Sunday, June 17, 2012



दोन पुढाऱ्यांचा संभाषण
---------------------------
काहीच दिवस झाले माझ्या तिकीटा बदल ची कहाणी मी सांगितलीच तुम्हाला..... त्याच तिकीटा बदल विचार करत होतो आणि
मग कॉल आला ... एका फोन चा cross connection झाला.... आणि दोन राजकारणी पुढाऱ्यांचा संवाद कानावर पडला ........एक बोलत होता दुसर्याला

... आपणच दोघे तिकीट घेऊ, आरे ऐक ना आपणच दोघे तिकीट घेऊ
उगीच तिसर्याला chance द्यायचा कश्याला
मी अर्धे मतं खातो , तू अर्धे मतं खा
खाण्याचं काम आपणच करू , तिसर्याचं पोट भरवायचं कश्याला.

आपणच दोघे, एकमेका विरोधात प्रचार करू
तिसर्याला प्रचारात मिरवू द्यायचं कश्याला
मी तुला बोलतो , तू मला बोल
चिखलात खेळायची सवयच आपल्याला , तिसऱ्या ला चिखलात भरवायचं कश्याला

वेळ प्रसंगी, आपणच प्रचारात एकमेकांना मारून पण घेऊ
उगाच लोकांना शंका कश्याला ..
मी करतो मारल्या सारखं, तू कर लागल्या सारखं
मधून येवढं तूझं माझं जमत आसताना , वरनं मित्रत्व दाखवायचा कश्याला..

निवडणूक झाल्यावर , दोघे मिळून काम करू ,
एक मेकांच्या धंद्या ची वाट लावायची कश्याला
तू निवडून आला तर , मी म्हटलं तिथ तू सही कर
मी निवडून आलो तर , तू म्हटलं तिथ मी सही करतो
दोघांचे गोदाम भरत असतांना , उगाच खिश्याला कडकी कश्याला ...

आपल्या ताटातून उरलेलं खाणारे , कुत्रे पण तेच ठेऊ
उगच तिसऱ्या कुत्राला, मटणाचा वास देयायचा कश्याला
तू सत्तेत आला तर २ कुत्रे तुझ्या साठी भुंकतील
मी सत्तेत आलो तर तेच कुत्रे माझ्या साठी भुंकतील
सगळी कडे आपलीच मक्तेदारी असताना , तिसऱ्या गुत्तेदाराला तयार करायचच कश्याला ...

म्हणूनच म्हणतो , दोघे मिळून तिकीट घेऊ
उगीच तिसऱ्याला, chance द्यायचं कश्याला
मी हाताला घड्याळ बांधतो, तू हात वर कर
हातावरच घड्याळ बांधलेली असतांना , इन्जीन म्हधला धूर किंवा धनुष्याची बाण सुटू द्यायची कश्याला
सुधाकर पाटील
जून १६ २०१२

Friday, June 8, 2012

आशी घडली माझ्या तिकीटाची कहाणी

आशी घडली माझ्या तिकीटाची कहाणी
२०१४ साठी तिकीट वाटप विचार मंथन सुरु होते... आणि मला आला फोन
मलाच आश्चर्य वाटले... अरे मला तिकीट देतय तरी कोण ?

मुंडे म्हणाले भावू या आजच तिकीट घेवून जा
... पांढर्या शुभ्र कमळाला, तुमचा भक्कम आधार द्या
नांदेड जिल्ह्या मध्ये भाजप चा तुम्हीच व्हा वाली
तुमच्या सारख्या तरुण तडपदार नेत्यांची काढा एक र्याली

पुन्हा फोन वाजला तेव्हा आमच्या सौ ने फोन उचलला
नांदेड वरून अशोकरावांच्या सौ. चा फोन ? … आमच्या सौ चा भाव वधारला
गावभर ती सांगत फिरली, याचं हवाय कॉंग्रेसला हात
चीखालीकरणे दाखवले दात यांचीच आता अशोकराव साहेबांना साथ
दुपार होत नाही आणि शंकर आणा स्वतः फोनवर बोलले
माझा होकार नकार मिळण्यापूर्वी.. कोंबडी वडे धाडले

वामकुशी घेता घेता K K साहेबांचा आला फोन
होते न्हवते सगळे अधिकार सोडले.....सोडा आता मौन
पाहून माझे मौन, फोनवर गोरठेकर साहेब बोलले
गेला आमचा हातातला मतदारसंघ, आत्ता नाटक पुरे म्हटले
म्हटले, “उठा सुधाकरराव तुमची पाहिजे आम्हाला साथ
गेलेला गढ आमुचा.. पहायचय आम्हाला आता तुमच्या हातात “
भास्कररावांसारखे हु हु करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले
नांदेड चे खासदार म्हनून घेण्या पलीकडे ह्यांनी काय केले
डोळा जरा लागत नाही , आमचे वसंतराव च बोलले
तिकीटाचं काय एक कॉलेज च देतो .. शांत आवाजात कोकालले

आता मला कळून आले मला आलाय डिमांड
मला वाटलं एकेकाचं आता घेतला पाहिजे कमांड
नावातल्या साधर्म्याने फोनवर फोन आले
सावंत सरने तर देगलूरचे तिकीट दिल्याचे, लगेचच सांगितले
संध्याकाळी पाय मोकळे करू असे मनासी म्हटले
रस्त्यावर उतरतो तर आन्तापुरकर वाटेतच भेटले
मी राम राम करणार तो हातच त्यांनी धरले
म्हटले काल पर्यंतचा मुंबई मधला व्यापारी मी
आताच कुठे देगलूर ला घाठले ,
सांगून त्यांची कहाणी
देगलूर ला चुकून न येण्याचा वाचनच, माझ्या काढणं घेतले

आता काय करावे खरच मला कळत नाही
हि म्हणते लढून पहा एकदाची लढाई
शिंप्याने एक सदरा शिवला त्याचे रंग दहा
एक सत्तेचा लालची त्याच्या सतरा तर्हा
त्यातलाच एक रंग, होता आवडायला लागला
तेवढ्यात माझा डोळा धाडकन उघडला

कळलं मला राजकारणात कायबी खरं नाही
मानसं कधी बदलतात याची नसते ग्वाही
डोळस असून मला काही कळत नाही
मत देताच पुसली जाते हाताची शाई
वाटतं आपल्यालाच करावे लागेल आता तरी काही
सगळा धिंगाणा उघड्या डोळ्याने आता पाहवत नाही
- सुधाकर पाटील
३१ मे २०१२
(संधर्भ: मूळ कविता 'तिकीट ' कोचरेकर मंगेश)