Thursday, August 12, 2010

ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव !!

काही केल्या आता वेळ माझा पळेना
गेले कसे दोन महिने मला ते कळेना
खालील भावना तुला बोलल्याविना
चष्मा, मला आता राहवेना

गेली माझी मैत्रीण,
विचार करूनच डोकं माजं ठणकतं
गेली कुठे तुझी मैत्रीण
रोज रोज मला रोज ते विचारतं
नाहीयेस तू इथे ,
विचार करून वस्तुस्तीचा, परत भानावर येतं
माझ्याशी बोलतं आणि हळूच म्हणतं

आयुष्याच्या प्रवासात
मानसं भेटतात आणि दुरावतात देखील
नाती जुळतात आणि तुटतात देखील
ओळखी वाढतात आणि विसरतात देखील
आठवणी रंगतात आणि पुसतात देखील
मैत्री करतात आणि तोडतात देखील

पण आसे आपले म्हणणारे जेम तेमच भेटतात
बिना श्याई च्या लेखणीने आखी डायरीच लिहून काढतात
एकच आहोत आपण आसं ओराढू ओराढू सांगतात
आणि आपल्या डायरीचा एक ते भागच बनतात

त्याच डायरीतला तू एक पान बनली आहेस
जशी आहेस तशी खूप छान आहेस

जवळची मैत्रीण म्हणनार्या पैखी मला तू भेटली
थोड्याच दिवसात आपण आपली सुख दुख वाटली
आठवणी आपल्या मैत्रीचे एका कोपऱ्यात साठली
तू जाताना मात्र माझी कंठ दाठली

जाता जाता माझी एकच विनंती करतो
विनंती कसली तुझ्या समोर माझा ते हक्कच बनतो
आयुष्यात तुझ्या ह्या मित्राची हमेशा आठवण ठेव
ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव
तुझा मित्र सुधाकर

No comments:

Post a Comment