Sunday, October 3, 2010

कधी होईल आपल्यांना भेटणं

मासान मागून मास गेले
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले

पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं

पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं

पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं

आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं

देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं

सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०