Thursday, September 23, 2010

बायको

आता पर्यंत मावशी , मामा , काका आत्या ह्या सगळ्या पाहुण्याच्या मुला मुलींचे लग्न लावले, मित्रांच्या लग्नामध्ये बिनधास्त नाचलो , मनसोक्त खाल्लं. नवरा नवरीच्या हसण्यावर , त्यांच्या लाजन्यावर , आपण चिडवल्या नंतर मनातून लाजून पण वरून हसण्यावर खूप हसलं. उखाण्यातून नाव घेण्यासाठी केल्याल्या आग्रह मुले परेश्यान झालेल्या नवरा - नवरी कडे पाहून स्वतः खुश
झालो. एकंदरीत दुसर्याचा लग्न म्हणजे आपली माज्याच माज्या करून घेतली . तेंवा कधी विचारही आला न्हवता कि त्या वधू वर जोडी वर किती दडपण आहे.
पण
पण जसं जसं लग्न जवळ येत माझं दडपण वाढत चाललाय . लग्न म्हणजे नेमकं काय आसतं ह्याचा मी विचार करू लागलो , आपली जोडीदार म्हणजे कोण आसते. तिच्या बद्दल आपल्या काय जबाबदाऱ्या आसतात ह्या विचारांनी दोख्यात घोड दल स्थापन केलाय. टिळा, कुंकू, लग्न, जोडीदार, बायको हे सगळे म्हणजे नेमकं काय. ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय, त्यांच्या महत्त्वाचं महत्व काय ? सगळ्या .. सगळ्या गोष्टी मला आता कुठं समजायला लागले नवे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता केल्या जात आहेत . हे गोष्टी आपापले दल करून डोक्यात आता सज्य होत आहेत. त्यातच कुठून तरी रोज एक गोष्टीचा उलघडा होत आहे , कुठून तरी आवाज येत आहे. आणि सांगत आहे अर्थ प्रत्येक गोष्टीचा. त्यातच काल एक आवाज आला ऐकण्यात आलं बायको म्हणजे काय ........... बायको म्हणजे काय असते ,

बायको म्हणजे सखी असते , बायको म्हणजे सोबती असते ,
बायको मैत्रीण असते , पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त असते
दिवान खाना कमी असतो पण देऊळ ज्यास्त आसतं
खरं तर बायको म्हणजे एक बंदर आसतं नवरा नावाच्या गालाबत्ता साठी
हे गलबत शिरा उभारून, निधड्या छातीने , साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं
या दर्यात शिरावं ... , दूर वरचे किनारे पहावे.......,
वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा .......,
संतप्त लाथांची मस्ती अंगावर घ्यावी ........,
ह्या दर्या च्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन जगावं ...
जगणं असं असावं कि पावुला पावुला वर मरणाशी मुलाखत व्हावी.... ,
आसं आणि ह्याहून हि कठोर निर्न्नय घेहून, दुर्दम्य इच्छेने समुद्रात जातो
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत असतांना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे
पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव ते दोन्ही घेऊन येतं ते आपल्या बंदरामध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होतं
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच ......

काय माहिती असे आवाज मला कुठून तरी आताच का ऐकू येत आहेत. मला वाटते अश्या आवाजाने एक एक दल साज्य होत आहेत पुढचा पावूल टाकायला मला साज्य करत आहेत.

सुधाकर पाटील
तारीख २३ सेप्टेम्बर २०१०