Tuesday, April 20, 2010

न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा

न राहिलो मी माझा
आता झालो मी कुणाचा !
आता कळलं मला
असाच आहे हा, रोग प्रीतीचा !!

एकटाच प्रवासी मी
प्रवास जीवनाचा ऐकताच करायचो ,
फुल काट्यांची वाट
आतापर्यंत एकटाच चालायचो !
पण अचानक माझ्या जीवनाची वाट ..
जणू स्वर्गाकडे वळली ,
पाऊलावर पाऊल ठेवणारी मला ..
पाटलीन बाई जे मिळाली .

वाटतं....,
कधी एकदा फोन, येईल तिचा
अन कधी एकदा मी, तिच्याशी बोलू
हृदयात साठवलेले गुणगान तिचे
कधी एकदा तिच्या समोर, बहाल करू

मधुर बोल तिचे जेन्वा
माझ्या कानावर पडतात ,
कानापासून थेट ते
काळजात शिरतात ,
आस वाटतं काळजात, मोठासा
खोपा करावा
प्रत्येक शब्द तिचा, त्यात साठवावा

कसं असतं नं......
दोन उन्हाड पाखरं ..
दोन वेगवेगळ्या दिश्यानी उडत होते ,
आप आपल्या ध्येय प्राप्तीसाठी ..
उंच भरारी मारत होते ,
परमार्थ कृपेने दोघांची भेट झाली
आता ध्येय हि एक, आणि दिश्या हि एक झाली .

वाटतं जीवनात पुढे जाण्यासाठी
आता दोनच गोष्टीची गरज आहे ,
डोक्यावरून हात मायेच्या ममतेचा ...
पाउलो पाऊली साथ सखीच्या प्रीतीचा ..
पाउलो पाऊली साथ सखीच्या प्रीतीचा ..
न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा !!!!!!
न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा !!!!!!


सुधाकर पाटील
तारीख : २० एप्रिल २०१०