Tuesday, February 2, 2010

अन आई लगेच तुझी आठवण होते !!

लाख आठवणी बांधून मनाच्या गाठी
निघालो मी स्वप्नांच्या पाठी
मन कचरते पावूल अडखळते
अन आई लगेच तुझी आठवण होते

खूप आवडता म्हणून, जेवताना
गरम गरम पोळ्या तू लाटायचिस
रोज अखेरची पोळी तिळाची, करायला
कधी नाही तू विसरायचीस
आता पोळी काय आसते हेच मी विसरतोय
पाच्यात्या फूड नेच पोट माझा भारवतोय
इथला पिझ्झा बर्गर खाताना , जीभ माझी रडायला लागते
अन आई लगेच तुझी आठवण होते

रोज जाताना शाळा कॉलेज ला,
ब्याग माझी तू भरायचीस
राहिला काही विसरून तरी,
धावत येवून ब्यागेत ते ठेवायचीस
इथं निघताना घाईत ऑफिस ला
काही न काही मझ्याकडनं विसरून राहते
अन आई लगेच तुझी आठवण होते.

रोज बाहेरून आल्यावर
आज काय बनवायचा विच्यारायचीस,
अन रोज नवीन नवीन प्रकार
जेवणात तू बनवायचीस,
मी पण रोज नवीन प्रकाराची मागणी करायचो
तुला होणार्या त्रासाचा विचार न करता
मनसोक्त ते हादडायचो
कांदे कापताना इथे स्वयपाकासाठी डोळ्यातून पाणी येते
अन आई लगेच तुझी आठवण होते

आई किती ग माज्या प्रकृतीला तू जपायचीस
दुखला डोकं थोडासा तरी तासंतास चेपायचीस
इथल्या थंडी ने डोकं रोज ठणठणते
अन आई लगेच तुझी आठवण होते

सकाळी उठल्यापासून धावपळ माझी सुरु होते
रात्री झोपे पर्यंत प्रत्येक क्षण, तुझ्या उनेवेची जाणीव करून देते
मग हळूच मनाला माझ्या एक कल्पना सुचते
तुला एक फोन केला कि सगळा काही सुरळीत होते

बघता बघता दिवस सरतील
दिवासंसोबत कामही संपतील
आई लवकर कामं आटपेन मी
आणि लवकर च तुला भेटेन मी

कधी कधी वाटता सगळा हे सोडावं
सरळ येऊन कुशीत तुझ्या पडावं
तुझ्या पायाजवळ माफी मागावी
तुज्या पासून दूर जाण्याची पुन्हा चुका न करावी
पण....
पण
"जीवनात पुढे जाण्यासाठी
बर्याच आवघड गोष्टीना सामोरे जावा लागते
आठवणीना विसरावे लागते
मनाला कठोर बनवावे लागते
भावनांना आपल्या मारावे लागते
काळजाला पालथा पाडावे लागते
जिभेची ची चव घालावी लागते
आश्रुना डोळ्यातच साठवावे लागते
चेहऱ्यावर हास्य फुलवावे लागते
नकोसे वाटणार्यांना पण जवळ आणावे लागते
आणि जवळच्यान पासून दूर जावे लागते "
अमेरिकेसाठी निघताना बोललेले ते तुझे वाक्य
कानात माज्या नेहमी गुंजते
अन आई लगेच तुझी आठवण होते
अन आई लगेच तुझी आठवण होते

सुधाकर पाटील
तारीख ०२ फेब्रुवारी २०१०