Monday, December 26, 2011

राजकारणातली घराणेशाही - थोडक्यात

कोणताही पक्ष स्थापन च्या वेळेस चे धोरण आणि विचारधारा, मग काही अनेक करणास्तव पक्ष्यात झालेले बदल, पक्ष्याने घेतलेले कलाटणी मुळे ,स्थापणे च्या वेळेस चे धोरण आणि आताचा पक्ष ह्यात खूप दुभंग निर्माण झालाय. मग आत्ता पण पक्ष्याची तीच विच्यार्धाराना असेल आसा विश्वास मी तरी नाही करणार. म्हणजे माझ्या गावात किंवा घरात कॉंग्रेस किंवा इंदिराजींचा कॉंग्रेस म्हणून आत्ता पण पंज्याला शिक्का मारणारे आहेत मग समोर रिंगणात कुणी आणि कसा का असेना. तसच एक उदारण भाजप बदल, मी लहान आसताना कदाचित मला मतदानाचा अधिकार पण नसेल तेंव्हा मी गावातल्या घरा घरात आणि माझ्या घरात विनंती केली कि विधानसभे वर कॉंग्रेस च्या उमेदवाराला ला वा कुणाला हि मतदान करा पण लोकसभे साठी आदरणीय वाजपायी साहेबाना मतदान करा (मला आमचे लोकल खासदार माहित पण नव्हते आणि निवडून आल्यावर पण कधी माहित नाही झाले :) ) . तसाच काहीं चा मत दुसर्या राजकीय पक्ष्य बदल पण आहे . सांगायचा मुद्दा म्हणजे पक्ष्याचे विचार सोज्वळ आहेत किंवा होते (होते आसच म्हणावे लागेल ) म्हणून मी आता कोणत्याही उमेदवार ला निवडून द्यायचा ??? ..... तसच घराणे शाही चं पण आहे. एखाद्या घरातले वडील लोकसभेचे किंवा विधानसभेचे सदस्य होऊन गेले, ते स्वतः कष्ट करून , लोकांच्या दुखात शामिल होऊन , लोकांचे दुख समजून समोर गेले होते पण आता त्यांचे मुलं , नातू इवेन पंतू आमदार-खासदार होतायत जे कधी सामान्य लोकांत बसलेले पण नसतात मग सामान्य लोकांचं दुख समजून घेणे आणि दुखात शामिल होणे तर सोडाच. कधी वडिलांच्या गैर हजेरीत कुणाचे लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावायला जावा लागतं तेवढाच बाकी काय माहित त्यांना कि सामान्य नागरिकांना , गरीब घरात जल्म दिलेल्या मुलांना काय दुख आसतात ते. पण नाही तरी आपण त्यांनाच पुढचे आपले युवराज घ्रहित करून ठेवतो . का ? आम्हाला पर्याय सापडत नाहीये का कुणी पर्यायी समोर येत नाहीये ? . का आणि कश्यामुळे ते आपल्याला खोधून काढावा लागेल आणि पात्र उमेदवाराला शोधून काढावा लागेल. कारण ह्या घराणे सहीचा वेल गावा गावात , प्रत्येक मतदार संघात , प्रत्येक पक्ष्यात पसरत जात आहे. का बाबा दुसरे काय पर्याय नाहीयेत कि त्यांना सोडून दुसऱ्यांत देश चालवायची क्षमताच नाहीये. ह्या आधी कि हि वेल आपले मुळ पक्की करेल त्या आधीच ह्या घराणेशाही ला उपडून फेकावा लागेल आणि एक विचारवंत उमेदवार ह्या देशाला द्यायला पाहिजे . हा आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे आणि आसा विचार आपल्या सारखे विचारी लोकच करू शकतात. आणि नुसता विचार करून शांत बसायचं नाही तर विचारवंत लोकांनाच विधानसभा, लोकसभे आणि सगळ्या स्थानिक राजकीय पदावर पाठवायचं आहे.
सुधाकर पाटील
२६ डिसेंबर २०११