Thursday, July 29, 2010

परदेश्यातला एकटेपणा

काल सकाळ मध्ये ब्लोग वाचला "परदेश्यातला एकटेपणा" अनेकांचे परदेश्यातल्या एकटे पानाचे किस्से सांगितले, सगळ्यांनी सुखद अनुभवा पेक्ष्या दुखद अनुभवच मांडली, ते सगळा वाचून वाटला खरच असेल का ते सगळा, खरच आस झाला असेल का एकटेपणा तसा ? त्यांच्या जीवनात आस झाला असेल वा नसेल पण हे सत्य आहे.

इथं निसान कार मध्ये फिरताना मला आठवण येते ते माझ्या आपाची ची, इथं हेलीकॉपटर ने ग्र्यांड कॅनोन फिरताना मला आठवण येत होती ती आपल्या सह्याद्री ची, (वाटत होता आपल्या राजेंच्या राज्यात जर आस प्रदेश आसला आसता तर राजे इथं कश्या प्रकारचा गडकोट बांधले आसते), रोज नको वाटून सुधा २*२ $ ची कॉफी पिताना आठवण येते ती आपल्या टपरीवरच्या चहाची .... इथले हॉट डॉग चे स्टोल्स बघितल्य्वर तोंडाला पाणी सुटते ते वडापाव , मिसळपाव च्या आठवणीने, इथला बर्गर खाताना आठवण येते ती आल्या ज्वारी च्या भाकरीची, फिरताना आठवण येते ते मैत्रिणीसोबत खालेल्या पाणीपुरीची, ........अन रोज हाताला चुटका बसला कि आठवण येते ते .............. आई ची ......
मग का यावा इतक्या दूर ?, का करावा एवढा मोठा उठाठेव ? .... काय तर म्हणे पैश्या साठी , काय पैसाच सर्व काही आहे ? , काय पैसा तिथे बसून नाही कमवू शकत आपण ? , आणि नाहीच कमावला तर नाही का चालणार ?????..........
अभिमानाने पाठ थोपवणारे बाबा तिकडे , मायेने हात फिरवून सगळा ताण घालवणारी आई तिकडे , प्रेमाने साद घालणारी पाटलीन बाई तिकडे ... आणि सदैव सोबत राहणारे , सदैव साथ देणारे माझे मित्र तिकडे ....मग मग मी काय करतो इकडे ?? , का आहे मी इकडे ? कश्या साठी आहे मी इकडे ? .....
घरी दादाला मुलगा झाला म्हणे पण मी नाही बघू शकत , शेतात बोर ला पाणी लागला म्हणे पण मला नाही दिसत, गावातल्या शाळेतले मुला पाटलाची वाट बघतायत पण मी नाही जाऊ शकत, आहो मित्रांचे लग्न होतायत पण मी नाही जाऊ शकत... , लग्नात वाजणाऱ्या ब्यांड ने आमचे पाय इथं थनथनतायत पण मी नाही नाचू शकत, बहिणीची मुलगी बोलायला शिकालीये मामा मामा म्हणतीये पण प्रतेक्ष्यात मी नाही ऐकू शकत .........मग का मी खुश होयायचा ? .... इथला इन्फ्राष्ट्रकचर पाहून ?, इथला बर्फ पाहून ? का इथल्या गर्मीत फिरणाऱ्या आर्ध्या उघड्या पोरी पाहून ? , का फक्त आणि फक्त आकाउंट मधला वाढत चाललेला ब्यालेन्स पाहून ....?

बर्याच गोष्टींचे उत्तर मी शोधत आसतो पण मला उत्तर नाहीच सापडत ..... पण कधी कधी वाटतं आयुष्यात काही करायचा असेल तर आशे कठीण दिवस बघावेच लागतील .... ते UP बिहारचे लोक १००-५० रुपयाच्या मजुरी साठी आपला प्रदेश सोडू शकतात मग आपण का नाही सोडू शकत , मग आपण का दूर नाही राहू शकत, ह्याला होमेसिक नेस तर नाही न म्हणत ? .....................
पण नाही ते UP बिहारचे लोक १००-५० रुपयाच्या मजुरी साठी आपला प्रदेश सोडला आणि आम्ही २००-१०० डॉलर साठी आमच्या माती पासूनच दूर आलोय ,....... नको नको नको हे होणे नाही, हे आम्हास शक्य नाही , आम्ही आलो काही कामा साठी , राजेंचा एक सरदार बनून , करू आम्ही लवकरच काम फत्ते आणि परतू आम्ही लवकरच अमुच्या मायदेशी , आमच्या मातीत पुन्हा खेळू , मायेश्या कुशीत पुन्हा झोपू , सह्याद्रीच्या कड्यावर बेधुंध पुन्हा फिरू , मित्रान सोबत पार्टी ला पुन्हा बसू , बाल मित्रान सोबत पुन्हा हासू, आणि पाटलीन बाई सोबत खोटा खोटा पुन्हा रुसू ,

तुमचा
सुधाकर पाटील
तारीख १५ जुलै २०१०