Thursday, January 19, 2012

काल्माडीची सुटका

हा हा हा , ९ महिने तुरुंगात राहिल्या नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे माजी अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी ची जमानत झाली आणि ते तुरुंगातून सुटले तेंव्हा आपला नेता सुटला म्हणून कॉंग्रेस भवन मध्ये म्हणे फटके वाजवण्यात आले, जल्लोष झाला. एकीकडे कॉंग्रेस च्या माननीय माणिकराव ठाकरेंचं , कलमाडी हे कॉंग्रेस कडून निलंबित झालले नेते आहेत त्यांचा पक्ष्याशी काहीएक संबंद नाहीये आस बोलणं आणि त्यांच्याच पक्ष्याच्या कार्याकारंनी चक्क कॉंग्रेस भवन मध्ये जल्लोष करणं पेढे वाटणं हे काही कॉंग्रेस चं विरोधाभासी वागणं वाटत नाहीये का?? . कलमाडी ची तिहार मधून सुटका झाल्यावर कॉंग्रेस भवन मध्ये जो जल्लोष झाला तो जल्लोष कॉंग्रेस च्या नेत्यांनी जवळून पाहायला हवा होता. मला हे कळत नाहीये ... कि एक नेता जो अत्यंत मोठा भष्ट्राचार करून जो जेल मध्ये गेला होता, ज्या व्यक्तीला पक्ष्यातून निलंबित केलं गेलं त्या व्यक्ती ची आता जेल मधून सुटका झाली म्हणून त्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद का व्हावा ??. ह्याच्या वरून आम्ही हे समजायचा का कि कॉंग्रेस ला पुण्या मध्ये दुसरा नेता नाहीये आणि कलमाडी शिवाय पर्याय नाहीये आणि तसं जर असेल तर त्याच पक्ष्याचे बडे नेते का म्हणतायत कि कॉंग्रेस चा आता कलमाडी शी काहीएक संबंद नाहीये ???? . कॉंग्रेस चा कलमाडी शी सबंध हे वरून लोकांना दाखवण्यासाठी नाहीये ?? का खरच काही संबध राहणार नाहीये ??. महानगर पालेकेच्या निवडणुकी मध्ये कॉंग्रेस चा प्रचार कलमाडी (खुलेआम) करणार नाहीयेत पण मधून कलमाडी शिवाय कॉंग्रेस ला गत्यंतर नाहीये एवढं समजण्या जोगे डोकं आहे आम्हा लोकांना.

ते जावूद्या पक्ष्याचं.... पण लोकांचा ह्या मध्ये काय विचार आहे. ९ महिन्या आधी जेन्वा कलमाडी भ्रष्टाच्यारात अटकले होते तेंव्हा पुण्या मध्ये निदर्शने झाले, capian झाले फासिबूक वर तर एकदम hot topic होता , त्या लोकांची प्रतिक्रिया आज काल्माडीची सुटका झाल्यावर कशी आणि काय असेल तेच महत्वाचं आहे. आणि त्याच बरोबर मतदार बंधूला जे काही झालं त्याची जान , आठवण आहे कि सगळं काही विसरून पालथ्या घागरीवर पाणी म्हणून मतदान करणार आहेत ते आता येत्या काही दिवसच कळेल.

मला एकच सांगायचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे कि पुण्याची जनता हुशार आहे , जाणती आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे तेंव्हा जनतेने महानगरपलीखे च्या निवडणुकीत विचार करून मतदान करावे. कलमाडी चा भ्रष्टाचार हे उघडकीस आलं म्हणून ते भ्रष्टाचारी झाले पण असे पण नेते आसतील जे भ्रष्टाचार केले , करत आसतील पण ते उघडकीस आले नसेल मग ते कॉंग्रेस चेच असतील आसं नाहीये ते कोणत्याही पक्ष्याचे आसतील. तेंव्हा मतदार बंधू तुमचा एक मत देतांना किमान २ मिनिट विच्य्रार करा आणि मगच मतदान करा .
मला वाटते मला हे सांगायची आवशकता नाहीये कारण मतदार बंधू जानकारी आहे त्याला सर्व काही माहिती असतं तेंवा ह्या मतदार बंधू ने आपला कल कुणाकडे देईल आणि पुण्याची जहागिरी बहाल कुणाला करेल ह्याची उत्सुकता आता आम्हाला आहे.
सुधाकर पाटील

Sunday, January 15, 2012

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला !

तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका

... सरकार म्हणतंय फेसबुक वर
आपले विचार मांडू नका
आहो सरकारला सांगा
उगीच आम्हाला गंडवू नका

सरकार ने केलेला अन्याय
सहन आता तुम्ही करू नका
अन्याय विरुद्ध लेखणी
तुमची कधी थांबवू नका

एक जुटीने विचार
आम्हाला आता करायचा आहे
गोड गोड बोलणाऱ्या नेत्यांना
चांगलाच धडा शिकवायचा आहे
आणि म्हणूनच.......
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका

सुधाकर पाटील
१५ जानेवारी २०१२

Monday, January 9, 2012

Veer Shivaji on Colors Chanel

मला कळला कि colors चानेल वाले खऱ्या इतिहास ला बाजूला ठेऊन निवळ मनोरंजन म्हणून वीर शिवाजी हि मालिकेचा प्रक्षेपण करत आहेत. मला हे सुरुवातीला जेन्वा colors वर मालिका सुरु झाली तेन्वाच वाटलं होतं कि हे colors वाले ह्या मालिकेला काहीही स्वरूप देतील, इतिहास बाजूला ठेऊन मनोरंजन मालिका चा स्वरूप देतील आणि मी जर हि मालिका बघितली तर मी खरा इतिहास विसरेन म्हणून आणि म्हणूनच हि मालिका मी फक्त एक दिवस पहिली आणि आणि पुढं न पाहण्याचा निर्धार केला. मित्रांनो आम्हाला राजेंचा इतिहास मनोरंजन म्हणून नाही पहायचा तर राजेंच्या इतिहासातून काही शिकण्या साठी, शिकलेल्या इतिहासातून स्वतःला घडवण्यासाठी राजेंचा इतिहास वाचायचा , पहायचा आणि ऐकायचा आहे .... मनोरंजन साठी आहेत च कि दुसरे भरपूर मालिका....
परत एकदा मी " स्टार प्रहाव वर आलेली "राजा शिवछत्रपती" पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण करा ... http://www.apalimarathi.com/ वर ..... आणि जर तुम्हाला वाटला कि colors वीर शिवाजी मालिके मध्ये काहीकी दाखवत आहे तर कृपया काहीही करून colors वरची "वीर शिवाजी" पाहण्यचे टाळा .. सुधाकर पाटील