Wednesday, March 17, 2010

आसाच आहे मी

असाच आहे मी
सगळ्यांत मिळून राहणारा
मनात कितीही दुख आसला तरी
चेहऱ्यावर हास्य फुलवणारा

नवीन लोकांना पण जवळ
लवकर मी करत आसतो
नातं एक तयार करून
आपलासा त्यांना बनवत आसतो
आसाच आहे मी
नात्यांत गुंतून राहणारा
कष्ट स्वतःला लागले तरी
नात्यांना जोपासून ठेवणारा

बोलना ज्यास्त बारा नसतं
लहानपणी मास्तरांनी सांगितला होतं
मी तरी काय करू
मला हि ते काळतं पण कधी नाही वळतं
आसच आहे मी
बोलत नुसता राहणारा
कंटाळत समोरचा आसला तरी
बडबड आपली चालूच ठेवणारा :)

एका गोष्टी सोबत माझा ज्यास्त खटकतं
खोटं कुणी बोललं तर डोकं आपला सनकतं
खोटं कधी खपून मी घेत नसतो
हो पण खोटं बोलल्या शिवाय
नासका कान्धा कधी विकत नसतो
आसाच आहे मी
खोटा खपून न घेणारा ,
खरं ते बोलून
समोरच्याला दुखावणारा

ह्या समाजात आलो मी
मला वाटता समजासाठी काही करावा
ह्या समाजाचं देणा लागतो मी
सामाजिक कार्य करून, ऋण ते फेडाव
आसाच आहे मी
नेहमी समाजाचा विचार करणारा
स्वतः अडचणीत असलो तरी
दुसर्यांच्या मदतीसाठी धावणारा

आसाच आहे मी
खूपच कुणाला आवडणारा
तर खरं बोलण्याच्या स्वभावामुळे
कुणाच्या डोक्यात बसणारा
जसा आहे तसा आहे मी
ह्यात आता बदल होणे नाही
कुणाच्या आवडी न आवडीने
स्वतःला बदलेने,
मला हे पटत नाही.

सुधाकर पाटील
तारीख : १७ मार्च २०१०