Wednesday, February 1, 2012

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी काढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणणारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे काढता पाय करावा लागला तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.
धर्माबाद तालुक्याचं बोलायचं झालं तर , परवाच्या नगर पालिकांच्या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धर्माबाद आणि उमरी तालुक्यांत एक तर्फी विजय मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना अभ्यास करायला पाहिजे ह्या विजयाचं नेमकं कारण काय होतं. माझ्या मता प्रमाणे ह्या भरगोस , एकतर्फी विजयाचं कारण एकच.. पक्ष्यातली एकजूट. होय पहिल्यांदा मी पहिला कि धर्माबाद तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते आपसातले भांडण सोडून आपसातले खेकड्याची चाल सोडून पक्ष्यासाठी काम केले, त्यांना काही घेणं देणं उरलेलं नव्हतं, उमेदवार कोण आहे आणि आपला त्या उमेदवार सोबत जमत का नी ते ...... त्यांनी फक्त मेहनत घेतली ते पक्ष्यासाठी प्रतेकानी आपला अहम सोडून , गर्व सोडून काम केले आणि एकतर्फी निकाल आणला.
पण परत पालत्या घागरीवर पुन्हा पाणीच , पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याची निवडणूक आली आणि सगळ्यांची आपसात लढाई सुरु झाली. प्रत्येक जन स्वतः चच तूनतूनं हे कसं खण खण वाजतंय हे दाखवायचा प्रयत्न सुरु केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना आणि "गल्लीतल्या " नेत्यांना एकच सांगू इच्छितो , बाबानो तुम्ही आपसातल्या भांडणं मुळे , खेकडी चाल मुळे तुमची धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती गमावली आता तेच चूक परत होईल आसं मला चित्र दिसतंय ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. माननीय शरद पवार साहेबांचं पण हेच म्हणणं आहे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत राष्टवादी कॉंग्रेस च्या थोड्या बहोत याश्याचं रहस्य आहे पक्ष्यातली एकजूट आणि जिथं कुठ अपयश आहे ते फक्त एकमेका मधल्या द्वेष मुळे किंवा स्वार्थामुळे .... तर मित्रानो विचार करा पक्ष्याशी एकजूट राहा, पक्ष्यासाठी काम करा मग पहा विजय तुमच्या कडे कसे धावत येतो ते.
-- सुधाकर पाटील

No comments:

Post a Comment