Sunday, February 26, 2012

एका लग्नाची दुसरी गोष्ट

एका लग्नाची दुसरी गोष्ट :मागच्या ३ आठवडा पासून मी एका मराठी मालिकेला follow करतोय. होय सध्या झी-मराठी वर एक मालिका येत आहे "एका लग्नाची दुसरी गोष्ट" , खूपच मस्त मालिका आहे. , एक एक पात्राची एक वेगळीच वोळख आहे, त्याचा रंग वेगळा आहे , स्वभाव वेगळा आहे मुख्य म्हणजे प्रत्येक कलाकाराने चोख कामगिरी केलेली आहे. नवीन पिढी आणि नवीन पिढी मधल्या विचारांची आणि जुन्या लोकांच्या इच्या आकांग्श्या ची नुसती गल्लत... कशी घातल्या जाते ते ह्या मालिके मध्ये दाखवलेला आहे . नवीन पिढीच्या मुलांना जुने लोक त्यांच्या प्रमाणे कसं वागवून घेतात, एकत्र कुटुंब लोक कशे आसतात, कसे वागतात हे सगळे ह्या मालिकेत पाहायला मिळेल. खरच एकत्र कुटुंब मध्ये हे असे पात्र रोज पाहायला अनुभवायला मिळतात. त्यांच्या सोबत वागताना , त्यांच्या सोबत वावरताना खूप माज्या येते. एकंदरीत एकत्र कुटुंब म्हणजे अशीच धमाल, कुठची हि धमाल करण्यासाठी कुणा बाहेर्च्याची आवशाकताच भासत नाही कारण कवयत्री कुहू घरातच असते, तर संथ ज्ञानेश्वर घरातच असतात , प्रत्येक गोष्टीवर भाषण देणारे राजकारणी व्यक्ती घरातच असते तर घरात काय चाललंय ह्याच्या कडे लक्ष नं देता आपल्याच धुन्धीत राहणारे पण घरातच आसतात. सगळ्यांना आपल्या प्रमाणे , जुन्या रूढी प्रमाणे वागणारी आणि सगळ्यांना वागवणारी 'आजी' पण घरात असते आणि एकदम नवीन विचाराने चालणारी rational निर्णय घेणारी एखादी व्यक्ती पण घरातच आसते. कुणाचाच विचार नं करता स्वतः चाच स्वार्थ साधणारी व्यक्ती घरातच असते तर दुसर्यांचा विचार करताना स्वतः ला विसरणारी, स्वतः काय हवंय हेच विसरून जाणारी 'आई' पण घरातच असते.
आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या मालिके मधून केलेला आहे.मला अतिशय आवडत आहे हि मालिका ...... तुम्हास आवडली का ? ...... नाही पाहिलात तर पहा तुम्हाला पण आवडेल का ते .................
सुधाकर पाटील

No comments:

Post a Comment