Sunday, January 3, 2010

हे नव वर्षा साथ माझी तू देशील का ?

कधी वाटतं उंच आकाशी उडावं
तर कधी वाटतं चंद्रावर च घर बांधावं
कधी वाटतं इथल्या बर्फात बिना ज्याकेट चा फिरवा
तर कधी वाटतं हिमालया वरच जाऊन राहावा .... (बायको सोबत हं :) )

कधी वाटतं इथल्या फ्रोजन नदी वर कब्बड्डी चा खेळ मांडवा
तर कधी वाटतं सागरातल्या शार्क बाई सोबतच नाचावं ... ( ते हि मराठी लावणीवर)
कधी वाटतं इथल्या हरिणान सोबत दोव्ड करावी
तर कधी वाटतं वाघाच्या तोंडात हात घालून दातच मोजावे

कधी वाटतं स्वप्ना पाहणं सोडावं
तर कधी वाटतं स्वप्नातल्या 'ति' ला प्रतेक्ष्यात च भेटावं
कधी वाटतं रोज लंच अमेरिकेत तर
डीनर घरच्यांसोबत भारतात करावं
तर कधी वाटतं घरचा सगळा बारदान
आत्ता इथं अमेरिकेत च घेऊन यावं

उंच आकाशी उडण्याच्या
गप्पा मी करत आसतो
पण निवळ आळस करून
पंख कापल्या वाणी मी बसत असतो
झटकून आळस माझ्यातला
नव चैतन्य माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

हरिणाच्या सोबत दोव्ड करण्याची
इच्या मी बाळगत असतो
पण आत्मविश्वास हरवून
पाय मोडल्या वाणी मी बसत असतो
स्वतःवर विश्वास ठेऊन समोर पळण्याचं बळ माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

शार्क सोबत खेळण्याच्या आन
वाघाच्या तोंडात हात घालण्याच्या
बाता मी मारत आसतो
पण हिम्मत खचून
हात तुटल्या वाणी मी वागत आसतो
भीती माझ्यातली घालवून
मोठ्या अडचणींना समोर जाण्याचा सामर्थ्य माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

जीवनात माझ्या, बर्याच गोष्टी मी साध्य केल्या
पण काही तश्याच रखडून राहिल्या
रखडलेल्या कामांना मार्गी तू आता लावशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

आयुष्यात काही मिळवो न मिळवो मित्रांना मी जमवला आहे
मित्रत्वाच्या धाग्याने मित्रांची माळ मी ओवली आहे
गाठ आमच्या मैत्रीची दिवसेनदिवस घट्ट बांधून
माझ्या सोबत त्यांच्या इछ्या पण पूर्ण तू करशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

हे नव वर्षा .....
ह्या आभाळा एवढ्या आकांक्षा माझ्या
त्यातल्या काही तरी तू पूर्ण करू शकशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

सुधाकर पाटील
तारीख ३ जानेवारी २०१०

No comments:

Post a Comment