Showing posts with label नसतेस सोबत तू जेन्वा. Show all posts
Showing posts with label नसतेस सोबत तू जेन्वा. Show all posts

Tuesday, May 1, 2012


नसतेस सोबत तू जेन्वा

नसतेस सोबत तू जेन्वा
जीव तुटका तुटका होतो ,
सगळ्यात बसून असताना
...उगाच भटकून येतो

नसतेस सोबत तू जेन्वा
मन तुझ्याच आठवणी रंगवतो
आठवणीत तुझ्या रमताना
उणीवेची तुझ्या
जाणीव करुनी तो देतो

नसतेस सोबत तू जेन्वा
काळीज ठोके थांबवतो
तुझ्या प्रेम स्पर्शाची
जणू वाट तो पाहतो

नसतेस सोबत तू जेन्वा
गाल चिंब चिंब होतात
डोळे हे वेडे रोज ...
अश्रू नाही
तर पाणीच ते ओकतात

नसतेस सोबत तू जेन्वा
घर सुनं सुनं वाटतो
एकटा मला पाहून
मलाच गिळण्यास उठतो

नसतेस सोबत तू जेन्वा
वेळ माझ्या शी भांडतो
भेटाल कधी आपण
रोज मला तो विचारतो

------ सुधाकर पाटील 
         १ मे २०१२