Thursday, July 29, 2010

परदेश्यातला एकटेपणा

काल सकाळ मध्ये ब्लोग वाचला "परदेश्यातला एकटेपणा" अनेकांचे परदेश्यातल्या एकटे पानाचे किस्से सांगितले, सगळ्यांनी सुखद अनुभवा पेक्ष्या दुखद अनुभवच मांडली, ते सगळा वाचून वाटला खरच असेल का ते सगळा, खरच आस झाला असेल का एकटेपणा तसा ? त्यांच्या जीवनात आस झाला असेल वा नसेल पण हे सत्य आहे.

इथं निसान कार मध्ये फिरताना मला आठवण येते ते माझ्या आपाची ची, इथं हेलीकॉपटर ने ग्र्यांड कॅनोन फिरताना मला आठवण येत होती ती आपल्या सह्याद्री ची, (वाटत होता आपल्या राजेंच्या राज्यात जर आस प्रदेश आसला आसता तर राजे इथं कश्या प्रकारचा गडकोट बांधले आसते), रोज नको वाटून सुधा २*२ $ ची कॉफी पिताना आठवण येते ती आपल्या टपरीवरच्या चहाची .... इथले हॉट डॉग चे स्टोल्स बघितल्य्वर तोंडाला पाणी सुटते ते वडापाव , मिसळपाव च्या आठवणीने, इथला बर्गर खाताना आठवण येते ती आल्या ज्वारी च्या भाकरीची, फिरताना आठवण येते ते मैत्रिणीसोबत खालेल्या पाणीपुरीची, ........अन रोज हाताला चुटका बसला कि आठवण येते ते .............. आई ची ......
मग का यावा इतक्या दूर ?, का करावा एवढा मोठा उठाठेव ? .... काय तर म्हणे पैश्या साठी , काय पैसाच सर्व काही आहे ? , काय पैसा तिथे बसून नाही कमवू शकत आपण ? , आणि नाहीच कमावला तर नाही का चालणार ?????..........
अभिमानाने पाठ थोपवणारे बाबा तिकडे , मायेने हात फिरवून सगळा ताण घालवणारी आई तिकडे , प्रेमाने साद घालणारी पाटलीन बाई तिकडे ... आणि सदैव सोबत राहणारे , सदैव साथ देणारे माझे मित्र तिकडे ....मग मग मी काय करतो इकडे ?? , का आहे मी इकडे ? कश्या साठी आहे मी इकडे ? .....
घरी दादाला मुलगा झाला म्हणे पण मी नाही बघू शकत , शेतात बोर ला पाणी लागला म्हणे पण मला नाही दिसत, गावातल्या शाळेतले मुला पाटलाची वाट बघतायत पण मी नाही जाऊ शकत, आहो मित्रांचे लग्न होतायत पण मी नाही जाऊ शकत... , लग्नात वाजणाऱ्या ब्यांड ने आमचे पाय इथं थनथनतायत पण मी नाही नाचू शकत, बहिणीची मुलगी बोलायला शिकालीये मामा मामा म्हणतीये पण प्रतेक्ष्यात मी नाही ऐकू शकत .........मग का मी खुश होयायचा ? .... इथला इन्फ्राष्ट्रकचर पाहून ?, इथला बर्फ पाहून ? का इथल्या गर्मीत फिरणाऱ्या आर्ध्या उघड्या पोरी पाहून ? , का फक्त आणि फक्त आकाउंट मधला वाढत चाललेला ब्यालेन्स पाहून ....?

बर्याच गोष्टींचे उत्तर मी शोधत आसतो पण मला उत्तर नाहीच सापडत ..... पण कधी कधी वाटतं आयुष्यात काही करायचा असेल तर आशे कठीण दिवस बघावेच लागतील .... ते UP बिहारचे लोक १००-५० रुपयाच्या मजुरी साठी आपला प्रदेश सोडू शकतात मग आपण का नाही सोडू शकत , मग आपण का दूर नाही राहू शकत, ह्याला होमेसिक नेस तर नाही न म्हणत ? .....................
पण नाही ते UP बिहारचे लोक १००-५० रुपयाच्या मजुरी साठी आपला प्रदेश सोडला आणि आम्ही २००-१०० डॉलर साठी आमच्या माती पासूनच दूर आलोय ,....... नको नको नको हे होणे नाही, हे आम्हास शक्य नाही , आम्ही आलो काही कामा साठी , राजेंचा एक सरदार बनून , करू आम्ही लवकरच काम फत्ते आणि परतू आम्ही लवकरच अमुच्या मायदेशी , आमच्या मातीत पुन्हा खेळू , मायेश्या कुशीत पुन्हा झोपू , सह्याद्रीच्या कड्यावर बेधुंध पुन्हा फिरू , मित्रान सोबत पार्टी ला पुन्हा बसू , बाल मित्रान सोबत पुन्हा हासू, आणि पाटलीन बाई सोबत खोटा खोटा पुन्हा रुसू ,

तुमचा
सुधाकर पाटील
तारीख १५ जुलै २०१०

Saturday, May 15, 2010

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत !!

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत
प्रेम.....
खूप ऐकला.. खूप वाचला हो प्रेमाबद्दल
पण लिहिण्याचा योग कधी आलाच नाही
वळली जरी लेखणी ..... तरी ती थांबायची.... आणि सांगायची .....
तू कसा लिहिशील रे प्रेमाबद्दल,
कारण तुला तर त्याची जाणीवच नाही

पण
आज मला थोडासा लिहायचय
प्रेमाबद्दल आता मला काय वाटतं.. आज जगाला ते सांगायचय

प्रेम म्हणजे काय असतं
आहो ज्यांना होता त्यानाच कळतं
भनक नहीं प्रेमाची,
त्याना मात्र
कवितेचा फक्त एक, विषय बनुन रहातं

प्रेमाला आनंत रूप
प्रेमाला आनंत रंग
जे खेळतात प्रेमाच्या रंगात
ते होतात बेदुन्ध
ज्यांनी नाही घेतला प्रेमाचा गंध
त्यांना काय माहिती प्रेमाचा सुगंध

आता पर्यंत खुप काही वाचण्यात आला
प्रेमाबद्दल खूप काही ऐकण्यात आला
पण
प्रेम काय असतं हे आता माला समजतय
कारण गोड तो प्रकार, आता माला होतंय
आणि प्रेमात होनाऱ्या गोडीचा आनंद
आता मी ते आनुभाव्तोय :) ....

खऱ्या मैत्री चा अर्थ
प्रेमातच कळतं
सोज्वळ नात्याचा महत्व
प्रेमातच उमजता

शुल्लक करणावर वाद
प्रेमातच होतात
निरर्थक गोष्टीवर हसण्याचे प्रकार
प्रेमातच चालतात

विषय नसताना पण, तासान तास
प्रेमीच बोलतात (सध्या तरी फ़ोन वर )
छोट्याश्या गोष्टीवर पण बडबड
प्रेमीच करतात

काही न बोलताच, बरच काही बोलून
प्रेमातच जातं
कही न ऐकताच, बोलण्याचा अर्थ
प्रेमातच समजतं.

आपलं कुणी जवळ असण्याचा आनंद
प्रेमातच फूलता,
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .

सुधाकर पाटील
तारीख 15 मे २०१०

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत !!

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत
प्रेम.....
खूप ऐकला.. खूप वाचला हो प्रेमाबद्दल
पण लिहिण्याचा योग कधी आलाच नाही
वळली जरी लेखणी ..... तरी ती थांबायची.... आणि सांगायची .....
तू कसा लिहिशील रे प्रेमाबद्दल,
कारण तुला तर त्याची जाणीवच नाही

पण
आज मला थोडासा लिहायचय
प्रेमाबद्दल आता मला काय वाटतं.. आज जगाला ते सांगायचय

प्रेम म्हणजे काय असतं
आहो ज्यांना होता त्यानाच कळतं
भनक नहीं प्रेमाची,
त्याना मात्र
कवितेचा फक्त एक, विषय बनुन रहातं

प्रेमाला आनंत रूप
प्रेमाला आनंत रंग
जे खेळतात प्रेमाच्या रंगात
ते होतात बेदुन्ध
ज्यांनी नाही घेतला प्रेमाचा गंध
त्यांना काय माहिती प्रेमाचा सुगंध

आता पर्यंत खुप काही वाचण्यात आला
प्रेमाबद्दल खूप काही ऐकण्यात आला
पण
प्रेम काय असतं हे आता माला समजतय
कारण गोड तो प्रकार, आता माला होतंय
आणि प्रेमात होनाऱ्या गोडीचा आनंद
आता मी ते आनुभाव्तोय :) ....

खऱ्या मैत्री चा अर्थ
प्रेमातच कळतं
सोज्वळ नात्याचा महत्व
प्रेमातच उमजता

शुल्लक करणावर वाद
प्रेमातच होतात
निरर्थक गोष्टीवर हसण्याचे प्रकार
प्रेमातच चालतात

विषय नसताना पण, तासान तास
प्रेमीच बोलतात (सध्या तरी फ़ोन वर )
छोट्याश्या गोष्टीवर पण बडबड
प्रेमीच करतात

काही न बोलताच, बरच काही बोलून
प्रेमातच जातं
कही न ऐकताच, बोलण्याचा अर्थ
प्रेमातच समजतं.

आपलं कुणी जवळ असण्याचा आनंद
प्रेमातच फूलता,
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .

सुधाकर पाटील
तारीख 15 मे २०१०

Thursday, May 6, 2010

Bayko

बायको मैर्तीन आसते, पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त आसते
दिवान खान कमी आसते पण देऊळ ज्यास्त आसता
खरतर बायको म्हणजे एक बंदर आसता नवरा नावाच्या गलबत साठी
हे गलबत शिरा उभारून , सात समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडता
या दर्यात शिरावा , दूर वरचे किनारे पहावे ,
वादळ वार्याशी मुकाबला करावा
संतप्त लाथांची मास्ठी अंगावर घ्यावी
जगणा आस आस्वा कि पौला पौला वर मरणाची मुलाखत व्हावी
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत आसताना गलबत सतत पाहत असता ते आपल्या बंदर कडे
पराभवाच्या झाखामा आणि विजयाचे उठसाव ते दोन्ही घेऊन येत ते आपल्या बंदर मध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होता
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच

Tuesday, April 20, 2010

न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा

न राहिलो मी माझा
आता झालो मी कुणाचा !
आता कळलं मला
असाच आहे हा, रोग प्रीतीचा !!

एकटाच प्रवासी मी
प्रवास जीवनाचा ऐकताच करायचो ,
फुल काट्यांची वाट
आतापर्यंत एकटाच चालायचो !
पण अचानक माझ्या जीवनाची वाट ..
जणू स्वर्गाकडे वळली ,
पाऊलावर पाऊल ठेवणारी मला ..
पाटलीन बाई जे मिळाली .

वाटतं....,
कधी एकदा फोन, येईल तिचा
अन कधी एकदा मी, तिच्याशी बोलू
हृदयात साठवलेले गुणगान तिचे
कधी एकदा तिच्या समोर, बहाल करू

मधुर बोल तिचे जेन्वा
माझ्या कानावर पडतात ,
कानापासून थेट ते
काळजात शिरतात ,
आस वाटतं काळजात, मोठासा
खोपा करावा
प्रत्येक शब्द तिचा, त्यात साठवावा

कसं असतं नं......
दोन उन्हाड पाखरं ..
दोन वेगवेगळ्या दिश्यानी उडत होते ,
आप आपल्या ध्येय प्राप्तीसाठी ..
उंच भरारी मारत होते ,
परमार्थ कृपेने दोघांची भेट झाली
आता ध्येय हि एक, आणि दिश्या हि एक झाली .

वाटतं जीवनात पुढे जाण्यासाठी
आता दोनच गोष्टीची गरज आहे ,
डोक्यावरून हात मायेच्या ममतेचा ...
पाउलो पाऊली साथ सखीच्या प्रीतीचा ..
पाउलो पाऊली साथ सखीच्या प्रीतीचा ..
न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा !!!!!!
न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा !!!!!!


सुधाकर पाटील
तारीख : २० एप्रिल २०१०

Wednesday, March 17, 2010

आसाच आहे मी

असाच आहे मी
सगळ्यांत मिळून राहणारा
मनात कितीही दुख आसला तरी
चेहऱ्यावर हास्य फुलवणारा

नवीन लोकांना पण जवळ
लवकर मी करत आसतो
नातं एक तयार करून
आपलासा त्यांना बनवत आसतो
आसाच आहे मी
नात्यांत गुंतून राहणारा
कष्ट स्वतःला लागले तरी
नात्यांना जोपासून ठेवणारा

बोलना ज्यास्त बारा नसतं
लहानपणी मास्तरांनी सांगितला होतं
मी तरी काय करू
मला हि ते काळतं पण कधी नाही वळतं
आसच आहे मी
बोलत नुसता राहणारा
कंटाळत समोरचा आसला तरी
बडबड आपली चालूच ठेवणारा :)

एका गोष्टी सोबत माझा ज्यास्त खटकतं
खोटं कुणी बोललं तर डोकं आपला सनकतं
खोटं कधी खपून मी घेत नसतो
हो पण खोटं बोलल्या शिवाय
नासका कान्धा कधी विकत नसतो
आसाच आहे मी
खोटा खपून न घेणारा ,
खरं ते बोलून
समोरच्याला दुखावणारा

ह्या समाजात आलो मी
मला वाटता समजासाठी काही करावा
ह्या समाजाचं देणा लागतो मी
सामाजिक कार्य करून, ऋण ते फेडाव
आसाच आहे मी
नेहमी समाजाचा विचार करणारा
स्वतः अडचणीत असलो तरी
दुसर्यांच्या मदतीसाठी धावणारा

आसाच आहे मी
खूपच कुणाला आवडणारा
तर खरं बोलण्याच्या स्वभावामुळे
कुणाच्या डोक्यात बसणारा
जसा आहे तसा आहे मी
ह्यात आता बदल होणे नाही
कुणाच्या आवडी न आवडीने
स्वतःला बदलेने,
मला हे पटत नाही.

सुधाकर पाटील
तारीख : १७ मार्च २०१०

Tuesday, February 2, 2010

अन आई लगेच तुझी आठवण होते !!

लाख आठवणी बांधून मनाच्या गाठी
निघालो मी स्वप्नांच्या पाठी
मन कचरते पावूल अडखळते
अन आई लगेच तुझी आठवण होते

खूप आवडता म्हणून, जेवताना
गरम गरम पोळ्या तू लाटायचिस
रोज अखेरची पोळी तिळाची, करायला
कधी नाही तू विसरायचीस
आता पोळी काय आसते हेच मी विसरतोय
पाच्यात्या फूड नेच पोट माझा भारवतोय
इथला पिझ्झा बर्गर खाताना , जीभ माझी रडायला लागते
अन आई लगेच तुझी आठवण होते

रोज जाताना शाळा कॉलेज ला,
ब्याग माझी तू भरायचीस
राहिला काही विसरून तरी,
धावत येवून ब्यागेत ते ठेवायचीस
इथं निघताना घाईत ऑफिस ला
काही न काही मझ्याकडनं विसरून राहते
अन आई लगेच तुझी आठवण होते.

रोज बाहेरून आल्यावर
आज काय बनवायचा विच्यारायचीस,
अन रोज नवीन नवीन प्रकार
जेवणात तू बनवायचीस,
मी पण रोज नवीन प्रकाराची मागणी करायचो
तुला होणार्या त्रासाचा विचार न करता
मनसोक्त ते हादडायचो
कांदे कापताना इथे स्वयपाकासाठी डोळ्यातून पाणी येते
अन आई लगेच तुझी आठवण होते

आई किती ग माज्या प्रकृतीला तू जपायचीस
दुखला डोकं थोडासा तरी तासंतास चेपायचीस
इथल्या थंडी ने डोकं रोज ठणठणते
अन आई लगेच तुझी आठवण होते

सकाळी उठल्यापासून धावपळ माझी सुरु होते
रात्री झोपे पर्यंत प्रत्येक क्षण, तुझ्या उनेवेची जाणीव करून देते
मग हळूच मनाला माझ्या एक कल्पना सुचते
तुला एक फोन केला कि सगळा काही सुरळीत होते

बघता बघता दिवस सरतील
दिवासंसोबत कामही संपतील
आई लवकर कामं आटपेन मी
आणि लवकर च तुला भेटेन मी

कधी कधी वाटता सगळा हे सोडावं
सरळ येऊन कुशीत तुझ्या पडावं
तुझ्या पायाजवळ माफी मागावी
तुज्या पासून दूर जाण्याची पुन्हा चुका न करावी
पण....
पण
"जीवनात पुढे जाण्यासाठी
बर्याच आवघड गोष्टीना सामोरे जावा लागते
आठवणीना विसरावे लागते
मनाला कठोर बनवावे लागते
भावनांना आपल्या मारावे लागते
काळजाला पालथा पाडावे लागते
जिभेची ची चव घालावी लागते
आश्रुना डोळ्यातच साठवावे लागते
चेहऱ्यावर हास्य फुलवावे लागते
नकोसे वाटणार्यांना पण जवळ आणावे लागते
आणि जवळच्यान पासून दूर जावे लागते "
अमेरिकेसाठी निघताना बोललेले ते तुझे वाक्य
कानात माज्या नेहमी गुंजते
अन आई लगेच तुझी आठवण होते
अन आई लगेच तुझी आठवण होते

सुधाकर पाटील
तारीख ०२ फेब्रुवारी २०१०