Wednesday, May 7, 2014

साहेब आता तरी आपण आम्हाला आपलं मानाल का !


       गाड्यांचा  ताफा फिरत होता , आरोप प्रत्यारोप , नक्कल करत सभा गाजत होत्या, विविध प्रकारच्या दस्त्या आणि टोप्या घातलेले नेते आणि कार्यकर्ते संच संच ने फिरत होते आणि एकदाचा मतदान झाला . महाराष्ट्राचा मतदान संपला . आता प्रत्येक व्यक्ती वाट पाहतोय तो १६ मे ची . प्रत्येकाला देशाचा पंतप्रधान कोण होणार ह्याचा प्रश्न पडत असतांनाच आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार ह्याची पण उस्तुकता लागली आहे … आणि त्यातलाच मी एक.  
        खरतर नांदेड मतदारसंघातून 'साहेबांचा' तिकीट फायनल झ्याल्यावर कोन्ग्रेस कार्याकार्यांचा जोश वाढला , देशात कुणाची हि हवा असो नांदेड मध्ये काही  फरक पडणार नाही म्हणून सगळे कार्यकर्ते निवांत होते. पण तसा अति विश्वास ज्यास्त दिवस नाही टिकला बरं का आणि म्हणून तर साहेबांनी प्रचार यंत्रणा जोरात चालू केली . साहेब, साहेबाच्या हाकेला हाजीर होणारे नेते आणि साहेबांसाठी दिवस रात्र एक करणारे , कष्ट करणारे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. ८ आमदार , जिल्हा परिषद चे सर्व सदश्य , महानगर पालिकेचे सर्व सदश्य , जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याच्या नगर परिषद, नगर पालिका चे सदश्य बाजार समित्या एकंदरीत सर्वच स्थानिक संस्था चे सदस्य सगळे सगळे आणि स्वतः साहेब जोरात प्रचार केले  , गावाच्या गल्ल्या गल्ल्या फिरले लोकांच्या दारा दारात जाऊन नांदेड जिल्ह्याला साहेब हेच खरे कसे हे सांगत होते. एकंदरीत नांदेड लोकसभा मतदारसंघ ला कॉंग्रेस चा एवढी प्रचंड प्रचार यंत्रणा मी तरी पाहिलं कधी पाहिलेली नाही. आणि त्या तुलनेत  भाजप  ची प्रचार यंत्रणा काहीच न्हवती. नगण्य होती.

      निवडणुकीच्या काळात नांदेड जिल्ह्या मध्ये पाऊल न टाकता पूर्ण च्या पूर्ण सत्ता  आणलेल्या साहेबांना ह्या वेळेस निवडणूक आवगढ गेली का ? , एवढ्या ताकदीनिशी प्रचार का करावा लागला ? , तालुका पातळी पासून ते जिल्हा पातळी पर्यंत तुमचीच सत्ता आसताना का एवढे कष्ट घ्यावे लागले ? .… प्रश्न पडतात ..पण मला ह्या सगळ्या खोलात जयायचं नाहीये   पण साहेब निवडणूक निकाल आल्यानंतर मतदान चे गणित(Analysis)  केल्या नंतर पडलेल्या मतदाना मुळे निवडून आल्या मुळे  आपणास मतदान करणाऱ्या मतदारांचा आपण आभार मानालच  पण न पडलेले मत का पडले नसावे ह्याचा विचार कराल का ? अख्या नांदेड जिल्ह्या बाद्दल मी काही म्हणणार नाही पण साहेब ''माझ्या, आमच्या''  धर्माबाद तालुक्यातून' न पडलेल्या मतदान बाद्दल कृपया विचार करा (मला इथे धर्माबाद तालुक्याला आपलं म्हणावं कि आमचा म्हणावं हे आजूनही काळात नाहीये ). धर्माबाद तालुक्यातून जे काही आपणास मत पडलं नसेल त्या न पडलेल्या मतांचं कारण तुम्ही शोधण्याचा कृपया प्रयत्न कराल का ?. जे काही टक्के मत नाही पडला त्याचं कारण काय नमो ची हवा असावं ? काय राष्ट्रवादी चे नेते कार्यकर्ते धोका दिले असावेत ?, का आपल्याच प्रचार यंत्रणेत कमतरता होती ? …… का धर्माबाद तालुक्याच्या (तुम्हाला मत न टाकलेल्या लोकांचा ) तुमच्यावर चा राग असावा ?

     साहेब ,मी काही पत्रकार नाहीये , नाही कुणी नेता , कार्यकर्ता , पण माझ्या Analysis नुसार ते थोड्या प्रमाणात हवा तर थोड्या प्रमाणात उलटी हवा होती     मग उलटी हवा का होती ? , का लोकांना राग यायला पाहिजे ? .. कारण साहेब आम्हा धर्माबाद तालुका वासियांना वाटतं आपण आम्हाला आपलं समजतच नाही. नाही समजत तुम्ही आम्हाला आपलं. आपलं  समजत असाल तर अशी वागणूक दिलीच नसती आम्हाला.
     प्रचार  दरम्यान एका NSUI  च्या सभेत एक विद्यार्थी आपणास प्रश्न विचारला म्हणे  कि भोकर तालुक्या  प्रमाणे आमच्या तालुक्याचा विकास का नाही झाला आणि आपण  उत्तर दिलात "मी भोकर चा विधानसभेचा उमेदवार होतो इथला नाही । आता मी नांदेड लोकसभेचा उमेदवार आहे आता आलो आहे मी तुमच्या कडे आता पहा कसा विकास करेन इथचा"  पहिली गोष्ट तर भोकर चा काय विकास झाला हे मला नाही माहिती आणि दुसरी गोष्ट  तुमच्या बोलण्या वरून आस वाटतं  " आपण आम्हाला (बाकीच्या तालुक्यांना ) आपला कधी समजलच नाही ?? आम्हीच वेडे  तुम्हाला आपले समजत आलो , आपण हात दिलात त्यांना आम्ही मत देत आलोत पण  काय पडलं  आमच्या पदरात ???? काय ?
    
     आदरणीय ,माननीय कै. शंकरराव चव्हान साहेबांच्या  इच्या शक्ती तून साकार कारखाना उभा होता , माननीय कै. लक्ष्मनराव हस्सेकर ह्यांच्या मेहनती तून कारखाना चालत होता  , मुबलक प्रमाणात पाणी नसताना १००० ते २००० एक्कर जमिनीवर शेतकरी उस लावत होता . आज आदरणीय ,माननीय कै. शंकरराव चव्हान साहेबांच्या कल्पनेतून बाभळी बंधारा उभा आहे ( कृपया ह्या साठी आता आपण प्रयत्न केलात आस म्हणू नका ) पाणी भरपूर आहे पण कारखान्याच्या वाटोळे पणा मुळे  शेतकरी उस लावणेच सोडला. लहान पण पासून ऐकत आलोत  नांदेड ते उमरी - जुन्नी - धर्माबाद मार्ग बासर राष्ट्रीय महामार्ग ४४ होणार पण काय आमचं आमचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं . धर्माबाद च्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडा संकुल का झाला नाही (का कुठे गेला आसे विचारायला पाहिजे ? ) , अनेक वर्षा पासून जागा असून चांगला ग्रामीण रुग्णालय नाही हो साहेब. क्रिटिकल वळेस लोक आधी दवाखान्यात जातात मग तिथे सेवा नसल्यामुळे नांदेड ला हलवायचा सल्ला मिळतो मग काय धर्माबाद हून नांदेड ला जाणारे रस्ते कसे आहेत हे माहीतच आहे … नांदेड गाठे पर्यंत त्या रुग्णाचा जीव ….... :( .... बरं जागा असून रुग्णालय होत नाहीये आणि आता मिरची प्रकीर्या केंद्र जागा नसण्याचा  कारण दाखवून धर्माबाद हून हलवायचा प्रयत्न होत आहे आसे समाजत आहे …. कसं करायचं साहेब धर्माबाद तालुका लोकांनी .
   धर्माबाद तालुकाचे रस्ते ह्या बदल तर काय बोलावे … आपणास देवगिरी ने यावे लागते ह्यातच सगळा उत्तर आहे. किती दिवस टिकतील माहित नाही पण आता काही छोटे रस्ते होत आहेत पण साहेब किती दिवस रस्ते बंधने परत त्याच गुत्तेदार च्या जड वाहन वाहतुकीमुळे खराब करणे पुन्हा बंधने ह्यालाच विकास म्हणायचा . ठीक आहे लोकल आमदार लोकांचे लोकल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत करत आहेत ,
जितकं त्यांना शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केले आणि करत आहेत  लोकांच्या सुख दुखात तरी हाजीर राहतात पण साहेब खासदार महोदय  चा काय काम आसतं हे ह्या तालुक्याला आजूनही समजलं नाहीये  ,समजत नाहीये हो.    

आपण आता पर्यंत आम्हाला आपलं कधी मानलच नव्हतं आसं मला तरी वाटतं पण साहेब एकच कळकळीची विनंती आहे , जे काही मत पडला नाही त्यात हवा असणे हे असून सुधा थोडा बहोत का होईना तुमच्यावरचा राग पण आसू शकतो ह्याचा कृपया विचार करा , आणि कोणताही माणूस आपल्या माणसावरच राग मानतो …. आपला समजतो त्याच्यावरच राग येतो ,  आम्ही धर्माबादी आपणास आपले मानत होतो , आत्ताही आपले मानतोच पण तोच धर्माबादी तुम्ही आता तरी आमच्या कडे लक्ष द्याल आता तरी आम्हाला आपलं मानाल ह्याच आशेवर टिकून आहे कृपया आता तरी आपण आमच्या कडे लक्ष द्याल का , आता तरी रस्ते बांधणे खराब होणे पुन्हा बांधणे ह्याच्या पेक्षा पुढे विकासाची व्याख्या जाईल का  ? आता तरी " आमच्या " तालुक्याचा शेतकरी पायावर उभा राहील का ?  .. आता तरी आपण आम्हाला आपलं मानाल का,  ? आतातरी आपण आम्हाला आपल्या ची वागणूक द्याल का ?

सुधाकर पाटील
७ मे २०१४ 
      

No comments:

Post a Comment