Wednesday, September 5, 2012

नोकरी बढती मध्ये आरक्षण

होय आरक्षण ला आमचा विरोध नाही
------------------
होय आरक्षण देण्याचा उदेश चांगलाच होता, त्या वेळेस एखाद्या समाजाची परिस्तिथी खूप बिकट होती , त्या समाजाबद्दलचे विचार हे खूप खालावलेले होते आणि त्या मुळेच ह्या परिस्तिथी ला तोंड देणारे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात ह्याची नोंद घेतली, वंचित समाजासाठी आरक्षण असायला पाहिजे ज्या मुळे वंचित समाज वर येईल आणि एक भक्कम भारत निर्माण होईल हाच त्यांचा उदेश होता . मला एवढंच म्हणायचं आहे त्यांचा उदेश चांगलाच होता पण आता हे जे काही चाललय ह्या राजकीय नेत्यांचा उदेश हा एक वेगळाच आहे . लोकांनी हे समजून घेयायला पाहिजे दोन्ही विचारांची तुलना होऊच शकत नाही. समाजातील विसंगत पना दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात नोंद घेतली होती आणि आता हे जे काही चाललंय ह्या मुळे समाजातला विसंगत पना दूर होणे तर दूरच पण ह्या उलट विसंगत पना वाढण्याला खत पाणी घालण्याचं काम चाललंय.

आता नोकरी मध्ये बढती देण्या च्या विधेयक बदल बोलायचा झालं तर ..... ह्यात फक्त राजकीय हेतू आहे असच मला वाटते ..... हे तर आसं झालं कि मुलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना आरक्षण दिला आणि पुढ प्रत्येक परीक्षे मध्ये आरक्षण , पहिल्या वर्ष्यातून दुसर्या वर्षी प्रवेश करताना पण आरक्षण , आणि दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या... ( आता तेच उरलाय ... खरच तिथ पण आरक्षण आणतील हे लोक .... आहो खुल्या वर्गाला पूर्ण विषय पास होणे गरजेचे तर, आरक्षण मुळे ४ विषय मध्ये नापास जरी झाले तरी पुढच्या वर्ष्यात प्रवेश आणि त्यांना ते ४ विषय मध्ये पास होण्याची गरज सुधा नाही ...... आसं पण करतील हे लोक ) ..... खरच एक वेळेस नोकरी लागली तर पुढ त्यांना कश्याला पाहिजे हो आरक्षण ? ... स्वतः च्या कार्यक्षमते च्या आधारावरच बढती होणे गरजेचे नाही का ?. आणि ह्या वर्गातील जे लोक नोकरी करत आहेत खरच त्यांना स्वतः ला पण वाटत असेल कि नकोय त्यांना आरक्षण ... पण ह्या राजकीय नेत्यांना पाहिजे ना . मला मान्य आहे पिच्याड्लेल्या समाजाला समाजातल्या व्यक्तींना समोर येण्या साठी आरक्षण गरज आहे पण मग काय बढती साठी पण ....

एक म्हण आहे ' एखाद्याला पाण्या जवळ नेऊ शकतो पण त्याला पाणी स्वतःच प्यावे लागेल' ...... इथं आरक्षण च्या बाबतीत उलट होत आहे .. एखाद्या ला पाण्या जवळ तर नेतच आहेत (ते पण ५ लोकांच्या खांद्यावर उचलून ) आणि पाण्या जवळ नेऊन पण तो पाणी पीत नसेल तर त्याच्या तोंडात पाणी टाकल्या जात आहे .... पुढ चालून मग काही दिवसांनी आसं होईल कि तो पाणी gitaknar नाही मग हे लोक त्याच्या नरड्यात नळी टाकून पाणी पाजावायचा प्रत्न करतील . एका वाक्यात बोलायचा असेल तर आरक्षण च्या बाबतीत राजकारण करू नये , डॉक्टर बाबासाहेबांचे निस्वार्थ आणि दूरदृष्टी उदेश समजून घ्यावे , बघावे कि खरच कोणत्या लोकांना आरक्षण ची गरज आहे , आणि आरक्षण देऊन लोकांना पाण्याजवळ नेण्यात यावे , पाण्याजवळ जाण्याची क्षमता द्यावी , त्याला पाणी पिण्यास सक्षम करावे पण पाणी पाजे पर्यंत आरक्षण नको .........

आजून एक खूप मोठा विषय हा पण आहे कि आरक्षण चा लाभ खरच गरजूंना होत आहे का ??? , कि आरक्षण च्या मुद्याचा लाभ हे राजकीय लोकांना ????? . गरजून पर्यंत आरक्षण चा लाभ जात आहे का ?? कि राजकीय लोक, राजकीय पार्टी पर्यंत आरक्षण च्या मुद्याचा लाभ ??? ….

मित्रहो म्हणूनच म्हणतो माझा विरोध आरक्षण ला मुळीच नाहीये , आरक्षण च्या मूळ उदेष्याला तर नाहीच नाही ..... पण ह्या आरक्षण वरनं जे काही राजकारण चाललय त्याचा वीट आलाय.

सुधाकर पाटील
६ सप्टेंबर २०१२

No comments:

Post a Comment