Sunday, June 17, 2012



दोन पुढाऱ्यांचा संभाषण
---------------------------
काहीच दिवस झाले माझ्या तिकीटा बदल ची कहाणी मी सांगितलीच तुम्हाला..... त्याच तिकीटा बदल विचार करत होतो आणि
मग कॉल आला ... एका फोन चा cross connection झाला.... आणि दोन राजकारणी पुढाऱ्यांचा संवाद कानावर पडला ........एक बोलत होता दुसर्याला

... आपणच दोघे तिकीट घेऊ, आरे ऐक ना आपणच दोघे तिकीट घेऊ
उगीच तिसर्याला chance द्यायचा कश्याला
मी अर्धे मतं खातो , तू अर्धे मतं खा
खाण्याचं काम आपणच करू , तिसर्याचं पोट भरवायचं कश्याला.

आपणच दोघे, एकमेका विरोधात प्रचार करू
तिसर्याला प्रचारात मिरवू द्यायचं कश्याला
मी तुला बोलतो , तू मला बोल
चिखलात खेळायची सवयच आपल्याला , तिसऱ्या ला चिखलात भरवायचं कश्याला

वेळ प्रसंगी, आपणच प्रचारात एकमेकांना मारून पण घेऊ
उगाच लोकांना शंका कश्याला ..
मी करतो मारल्या सारखं, तू कर लागल्या सारखं
मधून येवढं तूझं माझं जमत आसताना , वरनं मित्रत्व दाखवायचा कश्याला..

निवडणूक झाल्यावर , दोघे मिळून काम करू ,
एक मेकांच्या धंद्या ची वाट लावायची कश्याला
तू निवडून आला तर , मी म्हटलं तिथ तू सही कर
मी निवडून आलो तर , तू म्हटलं तिथ मी सही करतो
दोघांचे गोदाम भरत असतांना , उगाच खिश्याला कडकी कश्याला ...

आपल्या ताटातून उरलेलं खाणारे , कुत्रे पण तेच ठेऊ
उगच तिसऱ्या कुत्राला, मटणाचा वास देयायचा कश्याला
तू सत्तेत आला तर २ कुत्रे तुझ्या साठी भुंकतील
मी सत्तेत आलो तर तेच कुत्रे माझ्या साठी भुंकतील
सगळी कडे आपलीच मक्तेदारी असताना , तिसऱ्या गुत्तेदाराला तयार करायचच कश्याला ...

म्हणूनच म्हणतो , दोघे मिळून तिकीट घेऊ
उगीच तिसऱ्याला, chance द्यायचं कश्याला
मी हाताला घड्याळ बांधतो, तू हात वर कर
हातावरच घड्याळ बांधलेली असतांना , इन्जीन म्हधला धूर किंवा धनुष्याची बाण सुटू द्यायची कश्याला
सुधाकर पाटील
जून १६ २०१२

No comments:

Post a Comment