Tuesday, May 1, 2012

हातोडा - नांदेड जिल्हा

सध्या नांदेड जिल्ह्या मध्ये अतिक्रमण हटाव 'हातोडा' मोहीम खूप चर्चेत आहे . आस समजलं कि बाकी सगळ्या मोहिमेच्या "successful implementation " नंतर हि पण मोहीम success झाली आहे . लोकांनी पण तेवढाच प्रतिसाद देत आहेत , मोहिमेचा मुख्य भाग म्हणजे ह्या मोहिमेला लोकांनी मोठा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दाखवत आहेत आणि स्वत आपले अतिक्रमण हटवत आहेत. जिल्हाधिकारी नि हाती घेतलेले कॉपीमुक्त जिल...्हा , पडतापासनी आणि आता हि हातोडा मोहीम सगळ्याच मोहीम खूप व्यवस्तीत रित्या हाताळल्या गेल्या. खरच मागील ३ वर्ष्यात पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी ची कामगिरी तारीफ करण्याजोगी आहे . पण हे सगळे सगळ्याच लोकांना आवडेल आसे नाही, जिल्हाधिकारी च्या ह्या मोहिमे मुळे काही लोकांच्या पोटात कळ येत आहे आस समजलं. ते तर होणारच एखादा प्रशासकीय अधिकारी चांगला, निस्वार्थी आला सगळ्यात आधी पोट दुखतं ते राजकीय नेत्यांचं. आता फुकट आणि अनेक अव्यध मार्गाने अवाढव्य वाढलेल्या पोटावर लाथ बसत असेल तर पोट हे दुखणारच. काय तर म्हणे हे अश्या मोहिमे मुळे नांदेड जिल्ह्याचा विकास होत नाहीये , आरे मग कश्याने होतो विकास. तुमच्या फक्त कागदोपत्री शाळा, कागदोपत्री शिक्षक आसलेल्या आणि कागदोपत्री शाळेतून निघेले मुलं... हे आहे का विकास? कि कुठे पण अव्याध्य रित्या इमारती उभे करून रहदारीची कोंडी करणे हे आहे विकास ? ... हो असणारच कारण विकास पण तुम्ही कागदोपत्री दाखवता न ... मग तुम्हाला कॉपी मुक्त आणि पडतापासनी ची झळ हे लागणारच. वरून आता हे 'हातोडा' ... जे लोक (लोक म्हणजे राजकीय लोक बरं का ) ह्या मोहिमेला विरोध करत आहेत आणि शिष्टमंडळ घेऊन मुख्य मंत्री महोदय ला भेटणार आहेत नं, त्या लोकांच्या नक्कीच अव्यध जागेवर , अव्यध बांधलेल्या बगला, दुकानाचा गाळा आणि even शाळा कॉलेगे च्या इमारतीवर हातोडा पडत किंवा पडणार असेल .... म्हणूनच हि नाकदुखी चाललीये. आरे हो बरोबरच आहे , आता हे सगळा पडला तर मग विकास कसा होणार, सगळेच धंदे बंध झाले तर मग पैसा कसा येणार .... मग २ वर्ष्यावर आलेल्या election ची ताराजोड कशी होणार ....बाबानो तुम्ही तर कधी काही अभिमानाने सांगण्या जोगं काम नाही करत ( प्रत्येकाच्या लग्न , कार्यक्रम मध्ये जाऊन शाल घेण्याच्या व्यतिरिक्त - ते काम मात्र तुम्ही किंवा तुमचे पोरं बाळं अगदी उत्तम प्रकारे पार पडता बरं का ... खरच मानावे लागेल ). आता काही प्रशासकीय अधिकारी करतायत चांगलं काम तर करू द्या नं उगाच का नुसत्या उठाठेव करताय ????????.

सुधाकर पाटील
एप्रिल ४ २०१२

No comments:

Post a Comment